मध्यप्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या ७ विच्या विद्यार्थिनीने (student)गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे. ही घटना कटारा हिल्स पोलीस ठाणे हद्दीतील ग्लोबल पार्क सिटीची आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवले आहे.

विद्यार्थिनीने(student) सुसाईड नोट टिशु पेपरवर लिहून ठेवले आहे. माझा देह गरजू व्यक्तींना दान करा. तर दुसरा सुसाईड नोट तिने वहीत लिहून ठेवले. त्यात तिने लिहिले की माझी खोली आणि माझा कंप्यूटरसह सर्व सामान दोन्ही लहान भावाला द्या.विद्यार्थिनीने समाजशास्त्र या विषयाची वही हरवली होती. यामुळे तिचे वडील खूप ओरडले होते. त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

एक तासाच्या कामाचे 500 रुपये देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने महिलेसोबत बळजबरी केली. मुलापासून दडवून ठेवलेले दागिनेही घेऊन फरार झाला. या प्रकरणात आरोपीसंबधी कुठलाच ठाव ठिकाणा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला शोधून काढले. रजनीशकुमार दुबे (वय ५०, रा. कळमना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा रिवा (मध्यप्रदेश) येथील असून, गेल्या ५ वर्षांपासून नागपुरात राहतो. तो आचारीचे काम करतो.

पीडित महिला ५० वर्षांची असून, ती साफसफाई, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करते. तिला एक मुलगा आहे. मुलगा दारूच्या आहारी गेला असून व्यसनासाठी तो घरातील साहित्यांची विक्री करतो. त्याच्या भीतीने पीडित महिला दागिनेही सोबत ठेवायची. घटनेच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी ती कामावरून घरी जात असताना आरोपी रजनिश तिला रस्त्यात भेटला. मी महाराज आहे. भांडी धुण्याचे तासाभऱ्याचे काम आहे. यासाठी पाचशे रुपये देईन, असे आमिष दिले.

पीडिता त्याच्या आमिषाला बळी पडली. दुचाकीवर बसवून तिला प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत निर्जन अपार्टमेंटमध्ये तो घेऊन गेला. तिथे पायऱ्यावरच तिच्याशी बळजबरी केली. तिच्या जवळील पर्स हिसकावून पसार झाला. पर्समध्ये सोनसाखळी आणि रोख साडेतीन हजार रुपये होते. पीडित महिला अस्ताव्यस्त अवस्थेत खाली आली. आरडाओरड केल्यानंतर लोकांची गर्दी झाली. लोकांच्या मदतीने प्रतापनगर ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
‘फडणवीसांनी मराठ्यांना दिलेलं 16% आरक्षण उद्धव ठाकरेंमुळे गेलं’, ‘राऊतांची लायकी…’
उंटाला डिवचणं पडलं महागात! वाळवंटाच्या राजाने तरुणांना दाखवला रौद्रावतार, VIDEO VIRAL