मराठी मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेता (actor)बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. त्यांनी दूरदर्शनवरील ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिकेत साकारलेली ‘गुंड्याभाऊ’ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. या मालिकेत त्यांची जोडी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत प्रेक्षकांना अत्यंत आवडली.तीन दिवसांपूर्वीच बाळ कर्वे यांनी आपला ९५ वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बाळ कर्वे यांनी टीव्ही मालिका आणि रंगभूमीवरील दर्जेदार कलाकृतींमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांच्या टीव्ही कामांमध्ये ‘प्रपंच’, ‘राधा ही बावरी’, ‘वहिनीसाहेब’, ‘उंच माझा झोका’ या मालिका समाविष्ट आहेत.
चित्रपट क्षेत्रात त्यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाने आपला पहिला पाऊल ठेवला. त्यानंतर ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ अशा सिनेमांमध्येही त्यांनी अभिनय केला. मराठीत त्यांनी गाजवलेल्या गाण्यांपैकी ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’ हे गाणं त्यांच्या भूमिकेवर चित्रित झाले आहे.

त्यांच्या उत्कृष्ट अभिनय, मराठी भाषेवरील प्रभुत्व, नम्र स्वभाव आणि सहकलाकारांशी मैत्रीपूर्ण वागणूक या गुणांमुळे बाळ कर्वे मराठी मनोरंजनविश्वात आदरणीय कलाकार म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे अनेक मान्यवर आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत(actor)
हेही वाचा :
‘फडणवीसांनी मराठ्यांना दिलेलं 16% आरक्षण उद्धव ठाकरेंमुळे गेलं’, ‘राऊतांची लायकी…’
उंटाला डिवचणं पडलं महागात! वाळवंटाच्या राजाने तरुणांना दाखवला रौद्रावतार, VIDEO VIRAL
इचलकरंजी येथील ‘बीके’ गँगवर हद्दपारीची कारवाई