बॉलिवूडचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘परम सुंदरी’ येत्या 29 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक तुषार जलोटा यांच्या दिग्दर्शनाखाली आणि निर्माता दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटातील गाणी हिट झाली असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल(film) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘परम सुंदरी’ या चित्रपटाची(film) ऍडव्हान्स बुकिंग 26 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अवघ्या 24 तासांत तब्बल 10 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. ही बुकिंग प्रामुख्याने BookMyShow आणि District सारख्या प्लॅटफॉर्मवर होत आहे. ट्रेड तज्ज्ञांच्या मते, रिलीजची तारीख जसजशी जवळ येईल तसतसे हे आकडे आणखी झपाट्याने वाढतील.

रोमँटिक कॉमेडीची खासियत
रोमँटिक कॉमेडी चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच उघड्या मनाने स्वीकारतात. अशा चित्रपटांना फॅमिली ऑडियन्स आणि वॉक-इन प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात. या चित्रपटांचे खरे यश हे पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथवर अवलंबून असते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ या रोमँटिक चित्रपटाचा यशस्वी प्रवास त्याचे उत्तम उदाहरण आहे.

ट्रेडच्या रिपोर्टनुसार, ‘परम सुंदरी’च्या ओपनिंग डेवर साधारण 10 कोटींचे नेट कलेक्शन होऊ शकतो. प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर या कमाईत आणखी भर पडेल. हा चित्रपट(film) सिद्धार्थ मल्होत्रासाठी रोमँटिक जॉनरमधील भक्कम कमबॅक ठरू शकतो.

चित्रपटाची कथा
‘परम सुंदरी’ची कथा दिल्लीतील एक पंजाबी मुलगा परम (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि केरळची मुलगी सुंदरी (जान्हवी कपूर) यांच्या प्रेमकथेभोवती फिरते. दोघांच्या दुनियेत खूप फरक असतो. पण प्रेम त्यांना एकमेकांच्या जवळ आणते. या प्रवासात प्रेम, मस्ती, हशा आणि धमाल यांचा भरपूर तडका आहे.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल