गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हृताचा पती व दिग्दर्शक प्रतीक शाहने नवी (fans)चमचमीत बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली.प्रतीक शाहने निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार घेतली असून, फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं – “यंदाच्या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाने आम्हाला नवीन चाकांसह आशीर्वाद दिला. गणपती बाप्पा मोरया!” या पोस्टमधील छायाचित्रात हृतासह तिची सासू मुग्धा शाहदेखील दिसून येत आहे.

या पोस्टवर हृताने आपल्या पतीला साथ देत कमेंट केली आहे. तिने लिहिलं – “तुझा खूप अभिमान वाटतो.” चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनीही या नव्या कारसाठी हृता आणि प्रतीकवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.हृताने अभिनय क्षेत्रात पदार्पण दुर्वा या मालिकेतून केलं. त्यानंतर फुलपाखरू मालिकेतून ती घराघरात पोहोचली.(fans) मन उडू उडू झालं या मालिकेतल्या भूमिकेमुळेही ती चर्चेत राहिली. मालिकांसोबतच हृताने नाटकं आणि सिनेमांतही काम केलं आहे.टाइमपास ३, अनन्या, सर्किट, कन्नी या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले.(fans) तसेच हिंदी वेबसीरिज कमांडर करण सक्सेनामध्येही ती झळकली आहे. आता तिचा आरपार हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :
महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल