कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वेडा तुघलक म्हणून भारतामध्ये प्रसिद्धीस आलेल्या डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी भारतावर लावलेले आयात शुल्क गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट पासून लागू झाले. काल देशभर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आणि ट्रम्प यांची करप्रणाली व्यापार विघ्नाच्या स्वरूपात अस्तित्वात आली.

कापड, सूत, विविध प्रकारचे मासे, सुवर्ण अलंकार हिरे, विविध प्रकारची यंत्रे आणि त्याचे सुटे भाग, औषधे, औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, विविध प्रकारचे फळे, भाजीपाला, अशा कितीतरी प्रकारच्या उत्पादनांची निर्यात भारतातून अमेरिकेला केली जात होती. काही अब्ज डॉलर अशी दरवर्षी उलाढाल होत होती. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जानेवारी महिन्यात अधिकारावर आले आणि त्यांनी अगदी पहिल्यांदा काढले. जगभरातील अनेक देशांवर त्यांनी आयात शुल्क वाढवले.

भारतावर सुरुवातीला 25% आणि नंतर ते 50 टक्के पर्यंत नेले. हे आयात शुल्क गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट पासून लागू झाले. या आयात शुल्काचा भारताच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. किंबहुना तसे झालेच पाहिजे हा ट्रम्प यांचा उद्देश आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे आणि तेल विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा अर्थात रुबल रशियाला उपलब्ध होतो. भारत हा रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी करतो.

या माध्यमातून रशियाला मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो आणि हा पैसा युद्धावर अर्थात युक्रेंनच्या विरुद्ध वापरला जातो. असा जावई शोध ट्रम्प (Donald Trump)महाशयानी लावला आहे. रशियाकडून तेल खरेदी अर्थात इंधन खरेदी बंद करावी आणि असा निर्णय घेतला नाही तर आधीचे 25% टेरिफ 50 टक्क्यावर नेण्यात येईल शिवाय पेनल्टी घेतली जाईल असा दम ट्रम्प यांनी भारताला दिला होता मात्र इंधन कोणाकडून खरेदी करावे हा आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो आमचा अधिकार आहे, त्यामध्ये अन्य देशांनी हस्तक्षेप करू नये.

खुद्द अमेरिका रशियाकडून मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करते शिवाय इतरही उत्पादने विकत घेते हे ट्रम्प महाशयांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी भारतावर उगारलेले टेरीफ वेपन मागे घेतलेले नाही. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि ती नजीकच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. जगाच्या तुलनेत भारताचा वाढत चाललेला विकास दर हा डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या डोळ्यात खूपतो आहे. आणि म्हणूनच ते भारतीय अर्थव्यवस्था मृतवत असल्याचा डांगोरा पेटताना दिसतात.

भारताने आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित केल्यानंतर अमेरिकेचा जळफळाट झालेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी भारतावर 50% आयात शुल्क लावले आहे आणि दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या टेरीफ कार्डमुळे भारतीय बाजारपेठेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमेरिकेशी असलेला व्यापार मोठ्या प्रमाणावर खंडित होणार आहे ही वस्तुस्थिती आहे मात्र असे म्हणतात की जेव्हा एक दरवाजा बंद होत असतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडत असतो.

अगदी तसेच थोड्याफार प्रमाणात होताना दिसत आहे. भारताशी व्यापार करण्याबाबत रशियाचे अध्यक्ष ब्लादेमीर पुतीन यांनी लवचिक धोरण स्वीकारले आहे. भारतासाठी रशियाचे बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंध टेरिफ कार्डमुळे तणावग्रस्त बनणार याची चाहूल आधीच लागली होती. पण इतर देशांच्या तुलनेत भारतावर अन्यायकारक आयात शुल्क लावले जाईल असे वाटत नव्हतं. भारतावर लावलेले टेरिफ हे ट्रम्प यांच्या सूड भावनेतून घडलेले आहे.

भारत हा कोणत्याही स्थितीत आर्थिक महासत्ता बनता कामा नये हाच उद्देश ट्रम्प यांचा आहे. अमेरिकेच्या दबावाला भारत झुकेल, तो शरणागत होईल. विनवणी करेल, अशा भ्रमात असलेल्या ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत च्या घोषणेतून योग्य ते उत्तर किंवा संदेश दिला आहे.

अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या भारतीय उद्योजकांना, कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून नक्कीच उपाय योजना केल्या जातील. भारताप्रमाणे इतर देशही या टेरिफ कार्डमुळे अडचणीत आले आहेत. ब्रिक्स या संघटनेचे सदस्य असलेल्या देशांनी अशावेळी अमेरिकेच्या विरोधात वज्र मूठ दाखवली, अमेरिकेशी पूर्णपणे असहकार स्वीकारला तर अमेरिका सुद्धा अडचणीत येऊ शकते.

उद्भवलेल्या संकटाशी निर्धाराने सामोरे जाण्याचे धैर्य हे देश दाखवथशतील. ट्रम्प महाशय अजून साडेतीन वर्षे सत्तेवर असणार आहेत. त्यानंतर त्यांना अध्यक्ष निवडणूक लढवता येणार नाही. अन्य कुणीतरी अध्यक्ष म्हणून निवडून येईल आणि मग ट्रम्प महाशयांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार नक्कीच केला जाईल.

हेही वाचा :

एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स

अशा योजनांचं करायचं काय? धरणात पाणी, पाईप मध्ये नाय!

गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ब्रम्ह योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा