कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : करवीरवासीयांची पिण्याच्या शुद्ध पाण्याची(Water) तहान भागवण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेली” काळम्मावाडी धरण थेट पाईप लाईन योजना”म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुरुवारी गणरायाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेल्या करवीरवासियांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले.

ऐन गणेशोत्सवात आलेल्या या विघ्नामुळे लोकांनी विशेषतः महिला वर्गाने संतप्त होणे स्वाभाविक होते आणि घडलेही तसेच. शहराच्या अनेक भागात विशेषता बी वार्डमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रास्ता रोको यासारखे आंदोलन करावे लागले. या महत्वकांक्षी योजनेमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे या योजनेची दर्जाविषयक चिकित्सा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदार कंपनीवर कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे.
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन टाकून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा(Water) मुबलक पुरवठा करण्यात यावा ही अनेक वर्षांची मागणी काँग्रेस आघाडी सरकारने मान्य केली. आवश्यक असलेला निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली. निर्धारित वेळेत ही योजना पूर्ण होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ती कार्यान्वित व्हायला तब्बल नऊ वर्षे लागली. योजना पूर्ण करून ती महापालिकेकडे रीतसर हस्तांतरित केल्यानंतरही ती व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. या योजनेचे उत्तरदायित्व अजूनही संबंधित ठेकेदार कंपनीवर आहे.
बुधवारी गंभीर स्वरूपाचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गुरुवारी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला होता. हा नेमका बिघाड पाहण्यासाठी आयुक्त के मंजू लक्ष्मी या काळमवाडी येथे गेल्या होत्या. विना विलंब तांत्रिक बिघाड दूर करून शहराला पुरेशा दाबाने पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होत्या, मात्र गुरुवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीच पाणी विघ्न आले.
परिणामी शहराच्या काही भागांना पिण्याच्या पाण्याचा(Water) पुरवठा करण्यासाठी टँकरचा वापर करावा लागला. धरणात पाणी आहे आणि पाईपलाईन मध्ये नाही अशी स्थिती गुरुवारी निर्माण झाली होती. ही योजना करवीर वासियांसाठी कार्यान्वित करण्यात आल्यानंतर असा एक महिना गेला नाही की पाणीपुरवठा खंडित झाला नाही. महिन्यामध्ये किमान तीन-चार वेळा या योजनेतून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा झाला नाही. पाईपलाईन फुटली, व्हाल्वमध्ये बिघाड झाला, उपसा केंद्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली अशा अनेकविध कारणामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याचे अनेक प्रकार घडले. पाणीपुरवठ्यातील इतका व्यत्यय करवीरवासियांना अपेक्षित नव्हता.
या महत्वकांक्षी योजनेच्या आधी करवीरवासीयांना शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. थेट पाईप लाईन या महत्त्वकांक्षी योजनेचाच एक भाग म्हणून शिंगणापूर पाणीपुरवठ्याकडे पाहिले जात होते. सुमारे 70 कोटी रुपये न्याय योजनेवर खर्च झाले. पण या योजनेच्या पाईपला इतक्या वेळा गळती लागली की ही योजना नंतर गळकी योजना म्हणून कुप्रसिद्ध झाली. तथापि या योजनेमुळे जेवणा पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला त्यापेक्षाही जास्त व्यत्यय या थेट पाईपलाईन
योजनेत आला आहे.

वारंवार पाणीपुरवठा खंडित कराव्या लागणाऱ्या या योजनेच्या दर्जा विषयीची आता लोकांना शंका येऊ लागली आहे. टेंडर मधील अटी शर्थीप्रमाणे ठेकेदार कंपनीने काम केलेले नाही असा त्यातून निष्कर्ष निघतो आणि म्हणूनच या योजनेची तज्ञांची एक कमिटी नेमून चौकशी केली गेली पाहिजे.
काळम्मावाडी धरण थेट पाईपलाईन योजनेचे शिल्पकार म्हणून सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. ही योजना मंजूर व्हावी म्हणून महापालिका सभागृहाने विशेष आणि अथक प्रयत्न केले होते. आंदोलने केली होती. पाणी(Water) परिषद घेतली होती. असे असले तरी ही योजना मंजूर करून आणण्याचे श्रेय सतेज पाटील यांना द्यावे लागेल आणि तसे ते देण्यातही आलेले आहे. त्यामुळे या योजनेतील वारंवारच्या बिघाडाची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली जाते.
आपल्या प्रयत्नामुळे झालेली ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसेल तर त्यांनी स्वतःच ठेकेदार कंपनीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करावी. त्यांचे पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्या महादेवराव महाडिक यांनी या योजनेच्या माध्यमातून सतेज पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.
हेही वाचा :
गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ब्रम्ह योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
शिंदे गटाच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
मोहम्मद शमीला हसीन जहाँशी लग्न केल्याचा पश्चात्ताप? खेळाडूने दिले उत्तर