अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात काल घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा राजकीय(political circles) वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. सर्वांसमोर त्यांना कानशिलात मारण्यात आली, त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले.

पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर काही वेळ संगमनेर शहरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोर कोणाच्या छत्राखाली काम करत होते याचा शोध पोलिसांनी घ्यावा. जर काही लोकांना ठोकशाही आवडत असेल, तर महायुतीचे (political circles)कार्यकर्तेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देतील,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संगमनेरमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. अमोल खताळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष वाढत गेला असून आता तो ‘हिंदुत्ववादी खताळ विरुद्ध धर्मनिरपेक्ष थोरात’ अशा स्वरूपात पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद-प्रतिवाद होत असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

सत्यजित तांबे यांचा निषेध :
काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “लोकप्रतिनिधीवर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिस प्रशासनाने सखोल आणि निपक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे.”
अमोल खताळ हे संगमनेर मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा(political circles) निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. ते ठाम हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्यांना ठोस पाठिंबा आहे. थोरात-खताळ संघर्षामुळे संगमनेरची चर्चा राज्यभर रंगली आहे.
हेही वाचा :
महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल