भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमी(sports news) हा खेळापेक्षा जास्त वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 2014 साली शमीने हसीन जहांसोबत लग्न केलं. पण अवघ्या चार वर्षांतच दोघांमध्ये मतभेद झाले आणि ते विभक्त राहू लागले. हसीन जहांने शमी व त्यांच्या कुटुंबावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने घरगुती हिंसा, मॅच फिक्सिंग आणि अनेक महिलांशी संबंध असल्यासारखे गंभीर आरोपही केले. मात्र शमीने सर्व आरोप फेटाळून लावले.

हसीन जहां अनेकदा सोशल मीडियावरून शमीवर निशाणा साधत असते. तिने काही न्यूज चॅनेल्सवरही त्याच्यावर थेट आरोप केले. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने शमीला ‘औरतबाज’ म्हणत, तो गर्लफ्रेंड्सच्या मुलांना महागडी गिफ्ट्स देतो पण स्वतःच्या मुली आयराकडे दुर्लक्ष करतो, असा दावा केला.

शमीने (sports news)अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत या वादग्रस्त प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. हसीन जहांसोबतच्या लग्नाबाबत पश्चाताप आहे का, असं विचारल्यावर शमी म्हणाला “ते सगळं सोडा. मला कधीच भूतकाळाचा पश्चाताप होत नाही. जे झालं ते झालं. मी कोणालाही दोष देणार नाही, स्वतःलाही नाही. माझं लक्ष फक्त क्रिकेटकडे आहे. मला या वादांची गरज नाही.”

शमी म्हणाला की, क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोट दाखवणं योग्य नाही. त्याने उदाहरण देत सांगितलं की शिखर धवन, युजवेंद्र चहल यांच्यासारख्या खेळाडूंनाही वैवाहिक आयुष्यात संकटं आली. यावर शमीचं उत्तर होतं की, “चौकशी करणं हे तुमचं काम आहे, पण आम्हालाच फाशीवर का चढवता? दुसऱ्या बाजूचाही विचार करा. मी क्रिकेटकडे पाहतो, वादांकडे नाही.”

दरम्यान, शमीने सध्या दिलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनकडून खेळत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. नॉर्थ झोनविरुद्धच्या सामन्यात त्याने १७ षटकांत ५५ धावा देऊन एक बळी घेतला. एप्रिल-मे महिन्यातील आयपीएलनंतर तो प्रथमच मैदानात उतरला. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याचा हंगाम निराशाजनक ठरला होता. नऊ सामन्यांत केवळ सहा बळी मिळाले. यंदाच्या एशिया कपसाठी त्याला संघात स्थान मिळालेलं नाही.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल