आज शुक्रवार, 29 ऑगस्टचा दिवस काही राशीच्या(zodiac sign) लोकांसाठी चढ उताराचा राहील. चंद्र तूळ राशीमध्ये दिवसरात्र आपले संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र असेल.

तसेच शुक्र आणि चंद्रामुळे राशी परिवर्तन योग तयार होईल. यासोबतच गुरु चंद्रासोबत नवम पंचम योग तयार होईल आणि स्वातीनंतर विशाखा नक्षत्राच्या संयोगाने ब्रह्म योग तयार होणार आहे. या सर्व शुभ योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. शुक्रवारी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष रास
मेष राशीच्या(zodiac sign) लोकांचा आजचा दिवस शुभ राहणार आहे. यावेळी तुम्ही भागीदारीमध्ये केलेल्या कामाचा तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर भागीदारीत काम सुरू केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहील. मालमत्तेशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होऊ शकतो. मालमत्ता व्यवहार किंवा रिअल इस्टेटच्या कामात गुंतलेले असाल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कन्या रास
कन्या राशीच्या(zodiac sign) लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला व्यवसायात पुढे जाण्यासाठी अपेक्षित संधी मिळतील. तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही नवीन गोष्टींवर खर्च करू शकता आणि तुमच्या सुखसोयी वाढवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील.

मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबाकडून वारशाशी संबंधित काहीतरी मिळू शकते. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)
हेही वाचा :
महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल