दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा (students)आता शिगेला पोहोचली असून राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेसोबतच धाकधूकही वाढली आहे. उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शिक्षण विभागाकडून अंतिम तयारी पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.

विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या(students) मेहनतीचे फळ आता काही तासांत मिळणार असल्याने शाळांमध्ये, घराघरांत आणि सोशल मीडियावर निकालाबाबत चर्चा रंगली आहे. पालकही तितकेच उत्सुक असून मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दरम्यान, निकाल ऑनलाइन (students)पद्धतीने पाहता येणार असून अधिकृत वेबसाइटवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लॉगिन होण्याची शक्यता असल्याने संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.