पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज

पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन (farmers)वाढवलं असून, महाराष्ट्रातील हवामानाबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेला अंदाज आता चिंताजनक ठरत आहे. राज्यात सध्या अवकाळी पावसाचे फटके बसत असतानाच पुढील काही महिन्यांतील पावसाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.IMD च्या ताज्या अंदाजानुसार 2026 चा मान्सून महाराष्ट्रासाठी समाधानकारक ठरणार नाही.

संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमी (farmers)म्हणजेच सुमारे 92% पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची कमतरता जाणवू शकते. काही भागात 45% ते 65% पर्यंत कमी पावसाची शक्यता असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. यामागे एल-निनो प्रभाव मुख्य कारण मानला जात असून, त्यामुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, एप्रिल ते जून दरम्यान (farmers)काही भागात अवकाळी पाऊस आणि वादळी परिस्थिती दिसू शकते, पण हा पाऊस शेतीसाठी फारसा फायदेशीर ठरणार नाही. उलट अचानक पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच उत्तर महाराष्ट्रात अवकाळी (farmers)पाऊस आणि गारपिटीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे कमी पावसाचा अंदाज यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिने शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.