वाहनधारकांनो, हे काम आताच करा, अन्यथा बुधवारपासून PUC मिळणार नाही

वाहनधारकांसाठी अत्यंत (Vehicle)महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही अजूनही तुमच्या वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRPबसवली नसेल, तर हे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा मोठा फटका बसू शकतो. कारण येत्या बुधवारपासून HSRP नसलेल्या वाहनांना प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र म्हणजेच PUC देण्यास नकार दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य परिवहन विभागाने या (Vehicle)संदर्भात कडक भूमिका घेतली असून, वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी HSRP अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक वाहनधारकांनी अजूनही या नियमाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रशासनाने आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे.नवीन नियमानुसार, ज्या वाहनांवर HSRP बसवलेली नसेल, त्यांना PUC सर्टिफिकेट मिळणार नाही. याचा थेट परिणाम वाहनांच्या रस्त्यावरच्या वैधतेवर होणार आहे. PUC नसल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते, तसेच वाहन जप्त होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

HSRP प्लेटमध्ये विशेष (Vehicle)कोड, होलोग्राम आणि सुरक्षिततेचे अनेक फीचर्स असतात, ज्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे सरकारने ही प्रणाली सक्तीची केली आहे.वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा अधिकृत केंद्रांवर भेट देऊन लवकरात लवकर HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा बुधवारपासून नियम लागू झाल्यानंतर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.