भर उन्हाळ्यात गार आईस्क्रीम (icecream)किंवा कुल्फी खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात थंड पदार्थांकडे वळतात. मात्र याच काळात बाजारात मिळणाऱ्या काही कुल्फी आणि आईस्क्रीममध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

ज्यामुळे आरोग्याला गंभीर (icecream)धोका निर्माण होऊ शकतो.विशेषतः रस्त्यांवर किंवा अनधिकृत ठिकाणी विकली जाणारी कुल्फी तयार करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. काही ठिकाणी कृत्रिम रंग, खराब दर्जाचे दूध किंवा केमिकलयुक्त घटक वापरले जातात. अशा पदार्थांचा सतत सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.डॉक्टरांच्या मते, जास्त साखर आणि कृत्रिम घटक असलेले आईस्क्रीम खाल्ल्याने डायबेटिसचा धोका वाढतो.
तसेच ट्रान्स फॅट्स आणि (icecream)खराब फॅट्समुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींमध्ये हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो.तज्ञांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आईस्क्रीम किंवा कुल्फी खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह ब्रँड किंवा स्वच्छ ठिकाणांची निवड करावी. पॅकबंद उत्पादनांवरील घटक आणि एक्सपायरी डेट तपासणे अत्यंत गरजेचे आहे.उन्हाळ्यात थंड पदार्थांचा आनंद घ्या, पण आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.