आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठे बदल सुरू आहेत. पक्षांतराच्या लाटेत अनेक नेते भाजपमध्ये(political party) प्रवेश करत असतानाच, लातूरमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे शक्तीबुथ केंद्र प्रमुख आणि उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री(political party) देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच हेमंत जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून नाराजी व्यक्त केली. पक्षाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे व पक्षाने अपेक्षित काम न केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
जाधव म्हणाले, “मी वैयक्तिक कारणासाठी हा निर्णय घेतलेला नाही. ज्या उद्देशाने मी भाजपमध्ये कार्यरत होतो, त्या पैकी कुठलेही काम पार्टी करण्यास तयार नाही. त्यामुळे मी पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असून पुढे भाजपसोबत काम करणार नाही.”
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर जिल्हा दौऱ्यावर असून, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. म्हणजेच भाजपच्या मोर्चेबांधणीच्या तयारीत असतानाच हा पक्षत्याग पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
हेही वाचा :
टू-व्हीलरवर बायकोची बॉडी बांधून घेऊन निघालेला पती, Video तुफान व्हायरल
खुशखबर! आज 30 लाख शेतकऱ्यांना मिळणार 3200 कोटी रुपये
रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम