सांगली येथील बिरनाळे पब्लिक स्कूलच्या जलतरण तलावात बुडून सहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी संजयनगर पोलिसात शाळा प्रशासनासह तलावाची जबाबदारी असलेले दीपक सदलगे आणि विजय कांबळे अशा तिघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथील आदित्य ओलेकर या विद्यार्थ्याला चालू शैक्षणिक वर्षात बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात दाखल करण्यात आले होते. १ जूनपासून शाळा सुरू झाली. पालकांनी आदित्यचा प्रवेश निश्चित करतानाच ‘आदित्यला पोहता येत नाही’, (administration) अशी पूर्वकल्पना शाळा प्रशासनाला दिली होती.शनिवारी सायंकाळी शाळा प्रशासनाने आदित्यला इतर मुलांबरोबर जलतरण तलावात पोहायला नेले. तो पोहता येत नसताना तलावात उतरला कसा? आणि तिथे तैनात असलेले प्रशिक्षक किंवा जीवरक्षक काय करत होते? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्यचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर आदित्यच्या नातेवाईकांनी आणि पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शाळा प्रशासन आणि तलावाची जबाबदारी असलेले दीपक सदलगे व विजय कांबळे यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला. (administration) जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. नातेवाईकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत संजयनगर पोलिसांनी शाळा प्रशासनासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संजयनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’