महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात एकत्र मिळाला होता. पण आता जून महिन्याचा पहिला आठवडा संपला, पण हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. (account) त्यामुळे लाडक्या बहिणींना मे आणि जून या दोन महिन्यांचा ३००० रूपयांचा हप्ता एकत्र येणार का? असा प्रश्न राज्यातील पात्र महिलांना पडला आहे.

₹३००० की ₹१५००? लाडकीच्या खात्यात किती येणार पैसे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात सरकारकडून १५०० रूपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. (account) त्यामुळे मे महिन्याचा हप्ता रखडला आहे. १८ जून रोजी निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात लाभ जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. पण लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का? की फक्त मे महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होणार? अशी चर्चा सुरू आहे.
३००० एकत्र का मिळणार? कारण आले समोर आचारसंहितामुळे १८ जूनपर्यंत राज्य सरकारला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जून महिन्याच्या शेवटाला वटपौर्णिमा आहे. या सणाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना ३ हजार रूपयांचे गिफ्ट देऊ शकतो. सरकारकडून यावर विचार करण्यात येत असल्याचेही समजतेय. ३० एप्रिल २०२६ पर्यंत लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी पूर्ण झाली. (account) त्यानंतर सरकारकडून अर्जांची पडताळणी करण्यात आली. पण यामध्ये ८० लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचे समजतेय. राज्यात आता एक कोटी ६६ लाख महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ सरकारकडून बंद करण्यात आला आहे. पण ज्या महिलांची ईकेवायसी राहिली आहे, त्या महिला पुन्हा एकदा अर्ज करू शकतात, असे संकेत सरकारकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’