महागाईच्या वाढत्या काळात सुरक्षित गुंतवणुकीसोबत नियमित उत्पन्न मिळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. शेअर बाजारात जास्त परताव्याची संधी असली तरी त्यात जोखीमही मोठी असते. (post office) त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि खात्रीशीर पर्यायांकडे वळतात. अशाच गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आकर्षक पर्याय म्हणून समोर आली आहे.

भारतीय डाक विभागाकडून नागरिकांसाठी विविध बचत योजना उपलब्ध करून दिल्या जातात. आरडी , टर्म डिपॉझिट , पीपीएफ आणि किसान विकास पत्र यांसारख्या योजनांसोबतच पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना देखील लोकप्रिय ठरली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर खातेदाराला दर महिन्याला निश्चित व्याजाची रक्कम मिळते.सध्या या योजनेवर वार्षिक 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. एकल खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर संयुक्त खात्यामध्ये ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत आहे. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना सहभागी होता येते. (post office) तसेच या योजनेचे खाते सुरू करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा मुदतकाल पाच वर्षांचा आहे. या कालावधीनंतर गुंतवलेली मूळ रक्कम खातेदाराला परत मिळते. त्यामुळे नियमित उत्पन्नासोबत भांडवल सुरक्षित राहण्याचाही फायदा या योजनेत मिळतो. जोखीम टाळून निश्चित परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त मानली जाते.जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर 7.4 टक्के वार्षिक व्याजदरानुसार दरमहा सुमारे 616 रुपये व्याज मिळते. ही रक्कम प्रत्येक महिन्याला खात्यात जमा होत राहते. पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीनंतर गुंतवलेले 1 लाख रुपये मूळ स्वरूपात परत मिळतात. (post office) त्यामुळे घरखर्चासाठी किंवा नियमित अतिरिक्त उत्पन्नासाठी सुरक्षित पर्याय शोधणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा :
सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?