राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार?

पश्चिम बंगालमधील राजकीय उलथापालथीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेतील संख्याबळ आणि ताकद वाढवण्यासाठी ‘एनडीए’ने मोठी रणनीती आखल्याचे समोर आले आहे. (political) याचा थेट फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याचे संकेत आहेत. एनडीएच्या या नव्या खेळीमुळे शिवसेना युबीटी गटामध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडू शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत फूट पडली आहे. पश्चिम बंगालच्या आमदारांनंतर खासदारांनीही बंड केले आहे. २० खासदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे. (political) त्याशिवाय सत्ताधारी आघाडी म्हणजे एनडीए इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून लोकसभेत आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचून आपला कायदेविषयक अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. ममता बॅनर्जी यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातही फूट पडू शकते, असे सांगितले जात आहे.टाइम्स ऑफ इंडिया’ने एनडीएच्या सूत्रांचा हवाला देत याबाबतचे वृत्त दिले आहे. आता फुटीच्या धोक्यात असलेल्या पक्षांपैकी उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा एक पक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या प्रचंड विजयापासून यावर चर्चा सुरू आहे, पण आता याला अधिकच जोर आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या ९ खासदार आहेत.

लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सदस्यत्व वाचवण्यासाठी सहा खासदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल आणि (political) यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा सर्वात संभाव्य पर्याय मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’द्वारे ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांना अथवा विरोधातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूने आणण्यात शिंदेंना यश आले आहे. तर दुसरीकडे उद्धव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर मुंबईपुरताच मर्यादित राहिला आहे.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर