हृदयद्रावक! पार्किंगमध्ये खेळताना काळाचा घाला सेप्टिक टँकमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी?

भिवंडीतील फरीद बाग परिसरात पार्किंगमध्ये खेळताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय मोहम्मद अहमद मसूद टँकमध्ये पडला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले,(dilapidated) मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पार्किंगमधील सेप्टिक टँकचे झाकण तुटून चिमुकला आत पडला.स्थानिकांनी तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.इमारतीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप. भिवंडी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. (dilapidated) इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळात असतांना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून शोकाला पसरली आहे. घडलेली घटना फरीद बाग परिसरात घडली.

या दुर्दैवी घटनेतील मृत्यू झालेल्या चिमुकल्याचा नाव मोहम्मद अहमद मसूद असे आहे. १५ जुन हा विध्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस त्यामुळे विध्यार्थ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली होती. दुपारी वडील मसूद हे आपल्या मोठ्या मुलाला शाळेतून घरी घेऊन आले. (dilapidated) त्यांनतर लहानगा मोहम्मद अहमदत हा राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये मुलांसोबत खेळण्यासाठी गेला. खेळतांना तो पार्किंगमधील सेप्टिक टँकवर ठेवलेल्या पत्र्याच्या झाकणावर चढला. मात्र, हे झाकण आधीपासूनच खराब व कमकुवत अवस्थेत होते. त्यामुळे तो अचानक आत कोसळला आणि मोहम्मद अहमद थेट सेप्टिक टँकमध्ये पडला.

या घटनेनंतर खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरडा करत घरच्यांना आणि नागरिकांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत चिमुकल्याला बाहेर काढले आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने चिमुकल्याच्या आई वडिलांनी टाहो फोडला.निजामपूरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप इमारतीच्या देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतींमध्ये सुरक्षेच्या मूलभूत सुविधांकडे बिल्डर आणि सोसायटी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?