मोठी बातमी! मुलांच्या शिक्षणावर मिळणार 2.88 लाखांपर्यंत कर सूट; नियमात काय बदल झाला?

देशातील करदात्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुलांच्या (education) शिक्षणासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयकर नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून आता पालकांना शिक्षणाशी संबंधित खर्चावर अधिक करसवलत मिळणार आहे. या नव्या बदलामुळे पात्र करदात्यांना एकूण 2.88 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

नवीन नियमानुसार, शाळा व महाविद्यालयाच्या फी, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज, तसेच काही विशिष्ट शैक्षणिक (education)खर्चांचा समावेश करून करसवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या सवलतींवर मर्यादा कमी होती, मात्र वाढत्या शिक्षणखर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे, दोन मुलांपर्यंतच्या शिक्षणखर्चावर ही सवलत लागू होणार असून, करदात्यांना विविध कलमांअंतर्गत एकत्रित लाभ घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

यामध्ये शिक्षण (education)कर्जावरील व्याजासाठी वेगळी सूट आणि फीवरील सूट यांचा समावेश असल्याने एकूण लाभाची रक्कम लक्षणीय वाढू शकते.तज्ञांच्या मते, या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल आणि पालकांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल. तसेच अधिकाधिक लोक औपचारिक शिक्षणाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.