फळांमध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे दडलेले असतात. त्यातही अननस(pineapple) हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक फळ मानला जातो. यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट्स आणि पाचक एन्झाइम्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात. पण तितकंच खरं म्हणजे हे फळ सर्वांसाठी उपयुक्त नाही. काहींसाठी अननस खाणं उलट हानिकारक ठरू शकतं.

कोणासाठी धोकादायक ठरू शकतो अननस?
अॅलर्जी असलेले लोक
ज्या लोकांना आधीच दमा, फूड अॅलर्जी किंवा अॅटोपिक डर्माटायटीसची समस्या आहे, त्यांनी अननस टाळावा. कारण यामुळे ऍलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते. तोंड, ओठ व जीभ याभोवती खाज, पुरळ आणि सूज येण्याचा धोका असतो.
पोटाचे आजार असलेले लोक
गॅस्ट्रिक, अल्सर, अॅसिड रिफ्लक्स किंवा सतत अपचनाचा त्रास असलेल्या लोकांनी अननस खाणं टाळावं. यात असलेले अॅसिड्स पोटातील वेदना, छातीत जळजळ आणि अस्वस्थता वाढवू शकतात.
मधुमेहाचे रुग्ण
अननसात(pineapple) नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याचा धोका असतो. मधुमेह असलेल्या लोकांनी यापासून दूर राहणं सुरक्षित ठरेल.
उच्च रक्तदाब असलेले लोक
जास्त प्रमाणात अननस खाल्ल्यास रक्तदाब अस्थिर होऊ शकतो. काहींना डोकेदुखी, चक्कर येणे आणि चेहऱ्यावर लालसरपणा येण्याचा अनुभव येतो.
दात व हिरड्यांच्या समस्या असलेले लोक
अननसातील ब्रोमेलेन एन्झाइममुळे हिरड्यांमध्ये सूज, वेदना आणि संवेदनशीलता वाढू शकते. दात व हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी हे फळ मर्यादित प्रमाणात किंवा पूर्णपणे टाळावे.

अननस नक्कीच आरोग्यदायी फळ आहे, पण प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसारच ते खावं. कोणाला फायदा देणारं हे फळ काहींसाठी नुकसानकारकही ठरू शकतं. त्यामुळे ज्यांना वरील समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अननस आहारात समाविष्ट करावा.
हेही वाचा :
काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर…
विराट कोहलीच्या फिटनेस टेस्टबाबत मोठी अपडेट
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय कराल? आवश्यक कागदपत्रं व पद्धत..