राजस्थानच्या उदयपूरमध्ये घडलेल्या भीषण हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपी पतीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचं स्वागत करत नागरिकांनी याला महिला सुरक्षा आणि न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हटलं आहे(crime).

घटना 24 जून 2017 रोजी घडली होती. आरोपी किशनलाल हा पत्नी लक्ष्मीवर तिच्या रूपावरून वारंवार टोमणे मारत असे. “तू काळी आहेस” असे म्हणून तो तिचा छळ करायचा. अखेरीस एका रात्री त्याने पत्नीला कपडे काढायला लावून तिच्या अंगावर अॅसिडसदृश्य केमिकल लावले आणि जळत्या अगरबत्तीने चटके देत पेटवून दिलं. काही क्षणांतच लक्ष्मी आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडली.

या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरून गेला होता. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली होती. या खटल्यात सरकारी वकील दिनेशचंद्र पालीवाल यांनी 14 साक्षीदार आणि 36 कागदोपत्री पुरावे न्यायालयासमोर मांडले. आरोपीची क्रूरता आणि कृत्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
मावळी अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल चौधरी यांनी निर्णय देताना म्हटलं की, “हा अपराध केवळ पत्नीच्या हत्येपुरता मर्यादित नाही, तर आत्म्यालाच हादरवून टाकणारा आहे. अशा व्यक्तीचं पुनर्वसन शक्य नाही.” न्यायालयाने किशनलालला मृत्यूदंडाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला(crime).

स्थानिक नागरिकांनी या निकालाचं स्वागत करत म्हटलं की, “अशा शिक्षेमुळे समाजात गुन्हेगारांना स्पष्ट संदेश जाईल आणि कोणीही असा घृणास्पद गुन्हा करण्यापूर्वी शंभरदा विचार करेल.”
हेही वाचा :
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय कराल? आवश्यक कागदपत्रं व पद्धत..
हाताला परफ्यूम लावून यायचा, कानात हळूच सांगायचा, आज या हॉटेलमध्ये…अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट
“काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…