फेसबुकवरील ओळखीतून झालेल्या विवाहानंतर महिलेवर(woman) अत्याचार आणि जीवघेणा हल्ला करण्याची धक्कादायक घटना बेगमपुरा परिसरात घडली आहे. अमोल भाऊराव दुबे या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तो फरार आहे.

फिर्यादी सुनीता अमोल दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर २०२३ रोजी फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून त्यांनी अमोल दुबे याच्यासोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला. सुरुवातीला संसार सुखाचा सुरू होता. मात्र, लवकरच अमोलने दारूच्या नशेत पैशाची मागणी करत वारंवार मारहाण सुरू केली.
६ ऑगस्ट रोजी त्याने पत्नीला अॅसिड पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी माफी मागितल्याने सुनीता यांनी तक्रार दाखल न करता स्वतः अॅसिड पिल्याचा खोटा जबाब दिला. मात्र अत्याचार थांबला नाही. २७ ऑगस्टला पतीने घराबाहेर काढल्याने त्या मानलेल्या भावाकडे राहायला गेल्या होत्या.
मात्र, सोमवारी सकाळी सात वाजता घरी परतल्यानंतर अमोलने सुनीता यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. जबर मारहाण करून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कसाबसा सुटून सुनीता पुन्हा मानलेल्या भावाच्या घरी पळून गेल्या आणि नंतर बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी अमोल दुबे याच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमोल देशमुख करत आहेत(woman).
हेही वाचा :
काय होणार स्वस्त, GST कौन्सिलचा निर्णय लवकरच
शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! ६० कोटींच्या फसवणुकी प्रकरणानंतर रेस्टॉरंट ‘बास्टियन’ला कुलूप
मनोज जरांगेंना सरकारचा पहिला झटका, पोलिसांची मोठी कारवाई