मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर राजधानीत झालेल्या आंदोलनावरून मोठी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी(police) आंदोलकांवर तब्बल नऊ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे आणि दमदाटी करण्याचे आरोप आहेत.

आझाद मैदानात झालेल्या उपोषणादरम्यान हजारो आंदोलकांनी हजेरी लावली होती. हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले, मात्र या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

झोन १ मधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, आझाद मैदानात ३, मरीन ड्राईव्ह येथे २ तर जे. जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंदवला गेला आहे. अज्ञात आंदोलकांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या(police) मते, आंदोलनामुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि सामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे शांतता राखण्यासाठी कारवाई अपरिहार्य ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा बांधव आपल्या गावी परतू लागले आहेत. मात्र आता गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे. पोलिस तपास सुरू असून, सहभागी आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

बेडरूममध्ये नवऱ्याला कोंडून ती दीराच्या खोलीत शिरली, अन् केलं असं कांड..
मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची माहिती
Home Loan वर 0% व्याज, ₹1 ही मोजावा लागणार नाही…