हल्ली नोकरदार वर्ग, प्रामुख्यानं तरुण पिढी आर्थिक नियोजनावर अधिक भर देत असून, यामध्ये प्राधान्यस्थानी असतं ते म्हणजे स्वत:चं घर आणि त्यानंतर मग स्वत:चं वाहन आणि इतर सुखसोयी. मुळात इतर सुखसोईंसाठी पैशांची जुळवाजुळव करणं सहज शक्य होतं. मात्र घर खरेदीचा मुद्दा येतो तेव्हा मात्र आर्थिक मदतीसाठी कर्ज (Loan)मिळवण्याकरता बँकेचं दार ठोठावावंच लागतं.

सिबिल स्कोर चांगला असल्यास कर्ज मिळण्यास फारशा अडचणी येत नाहीत. मात्र होम लोन अर्थात गृहकर्ज घेत असताना त्यासोबत येणारा व्याजदर अनेकांनाच घाम फोडतो. कारण, बऱ्याचदा घराच्या किमतीहून अधिक रक्कम या व्याजाच्या स्वरुपात कर्ज फेडताना बँकेकडे सोपवली जाते. इथंही एक छुपा मार्ग आहे, जिथं गृहकर्जावर एक रुपयाही व्याज द्यावं लागणार नाही. कसं? जाणून घ्या.

गृहकर्जासमवेत SIP सुरू करणं हा एक महत्त्वाचा पर्याय. RBI च्या रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर गृहकर्जावरील व्याज सरासरी 8.25 टक्क्यांवर आलं. अशा स्थितीत जर 30 लाखांचं व्याज 20 वर्षांसाठी असल्यास दरमहा 25562 रुपये इतका हफ्ता भरावा लागतो. इथं ग्राहक बँकेला 31,34,873 + 30,00,000 रुपये देतात आणि त्यामुळं हे कर्ज दुप्पट होऊन जातं.

या कर्जावर (Loan)जर ग्राहकांना एकही रुपया जास्तीचा द्यायचा नसेल तर त्यासाठी SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला या क्षेत्रातील जाणकार देतात. ही गुंतवणूक जोखमीची असते, त्यामुळं इशी एसआयपी निवडणं गरजेचं असतं ज्यामध्ये गृहकर्जाच्या दुप्पट परतावा मिळत असेल.

तुमचा दरमहा हफ्ता 25562 असल्यास, त्यातील 12 टक्के एसआयपीमध्ये गुंतवले तर दरमहा 3000 रुपये होतात. अशा स्थितीत तुम्हाला अशा SIP मध्ये पैसे गुंतवावे लागतील जिथून 14 ते 16 टक्के परतावा मिळेल. ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी असेल. EMI सोबतच SIP केल्यास तुमच्याकडे 20 वर्षांनंतर 39,49,038 रुपये इतकी रक्कम असेल. बँकेला तुम्ही फक्त 31,34,873 रुपये देणं अपेक्षित असल्यानं तुम्ही पूर्ण नफ्यात असून तुमच्यावर 0 टक्के व्याज लागत आहे. एसआयपीची रक्कम वाढवल्यास पूर्ण घरही कर्जमुक्त करता येऊ शकतं.

गृहकर्जावरील व्याज शून्यावर कसं आणायचं?

हल्ली नोकरदार वर्ग, विशेषत: तरुण पिढी, आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये स्वत:चं घर घेणं हे प्राधान्य असतं. गृहकर्ज (Home Loan) घेताना व्याजदर हा मोठा खर्च ठरतो, कारण कर्जाची रक्कम आणि व्याज मिळून बँकेला दुप्पट रक्कम परत करावी लागते.

SIP मध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित आहे का?

SIP मध्ये जोखीम असते, पण डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड्स निवडल्यास जोखीम कमी करता येते. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कोणत्या SIP मध्ये गुंतवणूक करावी?

14-16% परतावा देणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंड्सची निवड करा. यासाठी SEBI-नोंदणीकृत सल्लागारांशी संपर्क साधा.

हेही वाचा :

जल्लोष झाला… पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? जाणून घ्या
“आझाद मैदानावरील जल्लोषात जरांगे-विखे पाटलांची सिक्रेट बैठक, कानात कानात नेमकी काय कुजबुज?”
रिंकू राजगुरूनं सांगितलं तिला कोण आवडतं; नावं ऐकून चाहते झाले आश्चर्यचकित