‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) आज मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. फक्त एका चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रिंकूचा प्रचंड चाहतावर्ग आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, पब्लिक अपिअरन्सेस आणि मुलाखतींवर चाहत्यांचे विशेष लक्ष असते. नुकतीच तिने दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी, भविष्यातील करिअर प्लान्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्रशबद्दलही मनमोकळं मत व्यक्त केलं.

मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं ‘तुझा क्रश कोण आहे, ज्याच्यासोबत तुला भविष्यात काम करायला आवडेल?’ या प्रश्नावर रिंकू(Rinku Rajguru) हसत म्हणाली ‘मला एका व्यक्तीचं नाव सांगता येणार नाही, कारण मला खूप लोक आवडतात. मला विक्रांत मेस्सी, विकी कौशल आणि कमल हसन यांचं काम खूप आवडतं.

ते सर्वजण वेगळ्या धाटणीचे कलाकार आहेत. त्यांचा अभिनय पाहताना खूप काही शिकायला मिळतं’ एका अभिनेत्यावर न थांबता रिंकू पुढे म्हणाली की तिला केवळ एका अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा नाही, तर चांगलं काम करणाऱ्या सर्व कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा आहे. ‘मला असं वाटतं की स्मिता पाटील आणि श्रीदेवी यांच्यासारखं दर्जेदार काम करायला हवं. त्यांच्या भूमिका, त्यांच्या अभिव्यक्ती खूपच प्रेरणादायी होत्या. आपल्या मराठी इंडस्ट्रीतही अनेक ताकदीचे कलाकार आहेत. त्यांच्यासोबतही काम करण्याची इच्छा आहे’

रिंकूच्या आतापर्यंतच्या फिल्मी प्रवासाकडे पाहिल्यास, ‘सैराट’नंतर तिने ‘कागर’, ‘झुंड’, ‘झिम्मा २’ यांसारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ती सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबतच्या ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटात दिसली. तिच्या प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना तिच्या अभिनयातील नवनवीन पैलू पाहायला मिळतात.

चाहत्यांची उत्सुकता वाढली आता आगामी काळात रिंकू कोणत्या हटके आणि प्रयोगशील भूमिकेतून चाहत्यांना प्रभावित करणार, याची उत्सुकता वाढली आहे. तिच्या क्रशबद्दल केलेल्या या खुलाशामुळेही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा :

“काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान…”, पंतप्रधान झाले भावूक

BSNL च्या 1 रूपयात 30 दिवस चालणाऱ्या Plan मुळे आनंदाने ‘वेडेपिसे’ झाले ग्राहक

रिलसाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला तरुण; इतक्यात ट्रेन आली अन्…; Video Viral