सोशल मीडियावर अलीकडे अनेक धोकादायक स्टंटचे व्हिडिओ(Video) पाहायला मिळत आहे. लोकांना अक्षरश: रिल बनवण्याचे, लाईक्स आणि व्ह्यूजचे वेड लागले आहे. यासाठी लोक काहीही करायला तयार होत आहे. अगदी आपल्या जीवालाही धोक्यात घालत आहेत. गेल्या काही काळापासून हे धोकादायक स्टंटचे प्रमाण तरुणांमध्ये फार वाढले आहे. आता हेच पाहा ना आणखी एक मुलगा रिल बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला आहे. याच वेळी त्यांच्या अंगावरु एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने गेली आहे. मात्र यामुळे गंभीर दुर्घटनाही घडली असती. ट्रेन गेल्यानंतर उठून आनंद साजरा करत आहे, जसे काही मोठे लक्ष्य प्राप्त केले आहे.

आतापर्यंत अशा स्टंटबाजीमुळे, हिरोगिरीमुळे अनेकांचा बळी गेला आहे. पण लोक सुधारण्याऐवजी अजून वेडेपणा करत आहे. याशिवाय केवळ स्टंटबाजीच नव्हे तर विचित्र विचित्र प्रकारचे व्हिडिओ देखील बनवले जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Aarzoo3007 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये हिरोपंती की पागलपंती? असे कॅप्श्न देण्यात आले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
आप क्या कहेंगे इसे हीरोपंती या पागलपंती?????
— Aarzoo (@Aarzoo3007) September 1, 2025
पूरा वीडियो देखें और अपनी राय ज़रूर दें…. pic.twitter.com/atmaIPF2nz
एका नेटकऱ्याने जेव्हा जगण्याचे हाल होत असतात, तेव्हा ही लोक अशी पागलपंती करतात आणि कुटुंबाच्या दु:खाचे कारण बनतात असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने रिलचे भूत काय काय करावेल लोकांकडून सांगणे कठीण असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने अशीच एक रिल शेअर करत हे तर काहीच नाही हे बघा असे म्हटले आहे. तर चौथ्या एकाने अशी व्हिडिओ बनवणाऱ्याला पहिल्यांदा चोपले पाहिजे असे म्हटले आहे. तर आणखी एकाने यमराज काका याला घेऊन जा, रिल बनवून त्याचे आयुष्य सार्थक झाले आहे. आता जायची वेळ झाली, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
13 नंतर डायरेक्ट Oneplus 15 आणणार कंपनी? फोटो-फिचर्स झाले लीक
“काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान…”, पंतप्रधान झाले भावूक
माझा नवरा घरी नाही, तुम्ही या! 52 वर्षीय सराफाला महिलेने घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…