सध्या लोकांना व्हायरल होण्याचे वेड लागले आहे. लोक यासाठी जीव धोक्यात घालत आहे. धोकादायक ठिकाणीवर स्टंटबाजी करत आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. पण लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा समावेश आहे. सध्या असाच एक व्हिडिओ(video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तीन तरुणांनी असा धोकादायक स्टंट केला आहे की पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(video) कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एक तीन तरुण एका रेल्वे ट्रॅकवर उभे आहेत. रेल्वे पूलावरुन जात असून खाली नदी आहे.

तीनही तरुण ट्रेन येण्याची वाट पाहत असतात. ट्रेन येताच तीन्ही तरुण खाली नदीत उडी मारतात. ट्रेन वाऱ्याच्या वेगाने येत असते. चुकूनही उडी मारायला कोणाला उशीर झाला असता, उडी मारताना उलट्या दिशेला तोल गेला असता तर यामुळे गंभीर दुर्घटना घडली असती.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sparkes_hub या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत आहे.

एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांमुळे चूकीचा मेसेज जातो लोकांमध्ये, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ट्रेन उशीरा आली नाही?, तर तिसऱ्या एकाने यमराज काकांनी उशीर केला थोडा असे म्हटले आहे. चौथ्या एकाने काय झालं आजच्या पिढीला? असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी