बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानची(Entertainment news) मुलगी सुहाना अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे अलिबागमध्ये सुहानाने खरेदी केलेल्या संपत्तीमुळे ती आता अडचणीत सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून लागवडीसाठी दिलेली जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना परस्पर विकल्याचे हे प्रकरण आहे.

अलिबागमधील थळ येथे उघडकीस आलेल्या प्रकरणामधील वादग्रस्त जमीन अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी अभिनेत्री सुहाना खानला विकण्यात आली आहे. नोंदणीकृत साठे कराराद्वारे विकलेल्या जमिनीची आता चौकशी सुरू झाली आहे.
अलिबागच्या तहसीलदारांना याप्रकरणी दोन दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत. अलिबागच्या निसर्गात अनेकजण प्रेमात पडले आहेत. त्यामुळे अलिबागच्या जागेला सोन्याचे दिवस आले आहेत.
जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध असल्याने अगदी तासाभरात मुंबईहून(Entertainment news) अलिबागमध्ये पोहोचता येत असल्याने अनेक कलाकारांसह शाहरुख खानची मुलगी सुहाना हिनेही अलिबाग तालुक्यातील थळ येथील जागा खरेदी केली होती. मात्र, तिने खरेदी केलेली जमीन वादात सापडली आहे.
थळ येथील सर्व्हे नंबर 345/2 मधील 0.60.70 हेक्टर जमीन लागवड आणि वापरासाठी नारायण विश्वनाथ खोटे यांना 1968 मध्ये शासनाकडून देण्यात आली होती. जमीन देताना ती जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय गहाण, विक्री अथवा इतरांच्या नावावर करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली होती.
मात्र खोटे यांच्या वारसांनी ही जमीन जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेताच 2023 मध्ये परस्पर सुहाना हिला नोंदणीकृत साठे कराराद्वारे 12 कोटी 91 लाखांना विकल्याचे समोर आले आहे. विक्री व्यवहारावर अलिबागमधील अॅड. विवेक ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय झालेला साठेकरार रद्द करावा, कारवाई करून जमीन शासनाकडे देण्याची मागणी त्यांनी केली आहे. वादात असलेले जमीन ही 78 हजार स्वेअर फूट इतकी आहे.
हेही वाचा :
मराठा आंदोलनावर हायकोर्टात तातडीची सुनावणी! सुट्टी रद्द करून कोर्ट उघडले
बहीण तरूणाच्या प्रेमात पडली, भावाच्या डोक्यात हैवान घुसला, चाकूच्या धाकावर दोनदा बलात्कार
‘मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून…’; मराठा आंदोलनाबाबत सदावर्तेंचा हायकोर्टात मोठा युक्तिवाद