गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बहीण(Sister)-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तळजाजवळ राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहित तरुणाने आपल्या २२ वर्षीय बहिणीवर दोन वेळा बलात्कार केला. आरोपीने चाकूचा धाक दाखवून तसेच सिगारेटचे चटके देत तिला त्रास दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे(Sister) गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ही माहिती मिळाल्यानंतर आरोपी भावाने तिला ब्लॅकमेल करून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या दिवशी दोन वेळा अत्याचार केला. त्या वेळी आरोपीची पत्नी घराबाहेर होती.
पीडितेने दुसऱ्या घटनेनंतर धैर्य एकवटून पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने वापरलेला चाकू आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी विवाहित असून त्याला एक मूल आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर पीडिता आपल्या पालकांसोबत राहते. पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
तुमचा Gmail पासवर्ड लगेच बदला! स्वत: गुगलनेच दिला वापरकर्त्यांना इशारा, धक्कादायक कारण…
फायरिंग अन् हाणामारी; भाजप महिला आमदार अन् तिच्या पतीवर हल्ला
मराठा आंदोलनावर हायकोर्टात तातडीची सुनावणी! सुट्टी रद्द करून कोर्ट उघडले