जर तुम्ही Gmail वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुगलने (Google) आपल्या सर्व वापरकर्त्यांना पासवर्ड बदलण्याचा आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. कारण सध्या जवळपास 2.5 अब्ज म्हणजेच 250 कोटी जीमेल अकाउंट्स हॅकिंगच्या धोक्यात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तुम्ही शायनीहंटर्सच्या रडारवर…
या धोक्याच्या मागे ShinyHunters नावाचा हॅकिंग ग्रुप आहे. पोकेमॉन फ्रँचायझीवरून प्रेरित नाव असलेला हा ग्रुप 2020 पासून AT&T, Microsoft, Santander यांसारख्या मोठ्या कंपन्यांना हॅक करून चर्चेत आला होता. आता त्यांनी Gmail वापरकर्त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यांची हॅकिंग पद्धत पारंपरिक पण अत्यंत धोकादायक आहे. फिशिंग ईमेल्सद्वारे अकाउंटमध्ये प्रवेश मिळवणे. हे ईमेल अगदी खरे वाटावेत असे तयार केले जातात. अशा मेलवर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या हाती लागू शकते.

जीमेल पासवर्ड
आपल्या सर्वांनाच एक जीमेल अकाउंटची गरज असते. तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन असो किंवा आयफोन. म्हणूनच जगात सुमारे 250 कोटी सक्रिय जीमेल अकाउंट आहेत. शायनीहंटर्सने हे हॅक केले आहे. त्यांची हॅकिंग पद्धत तीच जुनी आहे. ते ग्रुप ईमेलद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करते. ईमेल अशा प्रकारे लिहिलेला आहे की तो पूर्णपणे खरा दिसतो. तांत्रिक भाषेत याला फिशिंग म्हणतात. म्हणून, तुमचा जीमेल पासवर्ड बदलणे चांगले होईल. यासोबतच, टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) देखील सक्षम करा.

Gmail वापरकर्त्यांनी तातडीने काही पावलं उचलणं गरजेचं आहे :
– पासवर्ड ताबडतोब बदला – आणि तो नेहमीपेक्षा मजबूत ठेवा. (जन्मतारीख, नावं किंवा सोप्या कॉम्बिनेशन्स टाळा)
– टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) सुरू करा – यामुळे पासवर्ड हॅकरच्या हाती लागला तरी अकाउंटमध्ये प्रवेश करण्यासाठी OTP किंवा अतिरिक्त कोड आवश्यक होईल.
– सिक्युरिटी चेकअप करा – Gmail सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या अकाउंटची सुरक्षा तपासा.
– गुगलने स्पष्ट केलं आहे की, वापरकर्त्यांनी जर हे सुरक्षात्मक उपाय केले नाहीत, तर हॅकर्सना अकाउंटमध्ये घुसखोरी करणं सोपं जाईल.

हेही वाचा :

मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारासोबत गैरवर्तन?

Ileana D’cruz घेतला मुलांसाठी ‘मोठा’ निर्णय

मोठी बातमी, आंदोलकांचा शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न