मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण(reservation) द्या या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. त्यांना साथ देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चौथ्या दिवस आहे. मात्र आतापर्यंत सरकार आणि आंदोलकांमध्ये काही तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.

मराठा आंदोलकांनी शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी(reservation) सुरु असणारा आंदोलन आता चिघळलं आहे का? अशी चर्चा जोराने सुरु झाली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काही आंदोलकांनी आज सकाळी शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याने मोठा अनर्थ टळला. तर दुसरीकडे काही आंदोलकांनी बेस्टची बस देखील अडवण्याचा प्रयत्न केला होता.

रविवारी 30 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन करत मुंबईकरांना त्रास होणार नाही असं आंदोलन करा असा आवाहन केला होता मात्र असं असून देखील काही आंदोलकांकडून नको त्या गोष्टी करण्यात येत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आंदोलनाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण(reservation) द्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. आरक्षणासाठी हा मनोज जरांगे पाटील यांचा आठवा आंदोलन आहे. 27 ऑगस्ट रोजी या आंदोलनासाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. तर 29 ऑगस्टपासून त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची सुरुवार केली आहे.

राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आजपासून (1 सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पाणी न पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आंदोलनावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी काही ओबीसी नेते करत आहे.

हेही वाचा :

चौकट आणि चौकटीच्या आहे काही तरी पलिकडे!

20 हजाराने स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra 5G, Flipkart – Amazon वर धमाकेदार ऑफर

Ileana D’cruz घेतला मुलांसाठी ‘मोठा’ निर्णय