सोलापुरात एका कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत पाच जणांच्या संसारावर भयानक प्रकार घडला. दोन चिमुकले, आई – वडील आणि आजी रात्री झोपले आणि सकाळी बेशुद्धावस्थेत सापडले. या घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू(death) झाला आहे. तर सासू सूनेवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्या दोघी गंभीर अवस्थेत आहेत. तर नवऱ्यावर उपचार सुरु आहे. रात्री एका चुकीमुळे पाच जणांसोबत भयंकर प्रकार घडला आहे.

ही घटना सोलापुरातील लष्कर भागात सकाळी 11 च्या सुमारास समोर आली. हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं असताना मध्यरात्री खोलीत झालेल्या गॅस गळतीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडरफुलजवळ युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय 40) यांचं कुटुंब वास्तव करत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी रंजना (वय 35), आई विमल (वय 60), मुलगा हर्ष (वय 6) आणि मुलगी अक्षरा (वय 4) अशा पाच जण होते. युवराज बलरामवाले हे गोवंडी म्हणून काम करायचे आणि पत्नी रंजना विडी कामगार आहेत. बेडरफुलजवळ त्यांचं दहा बाय पाचचं छोटंसं घरात एका चुकीमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं.

घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री हे कुटुंब रात्री जेवण घरून हवा बंद खोलीत झोपलं असताना रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत वायू गळती झाली. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले. रंजना यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असताना ही घटना समोर आली आहे. त्यांना हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना सर्वांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, उपचारादरम्यान हर्ष आणि अक्षरा यांचा दुर्दैवी मृत्यू(death) मृत्यूने खळबळ माजले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार, गॅस गळतीमुळे गुदमरून हे कुटुंब बेशुद्ध झाले त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गेली असता सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

आज अनेक शुभ योग; ‘या’ 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस…

“आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

राज्यात आजही पाऊस हजेरी लावणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी