दुहेरी आयुष्य उघडकीस! दिवसा गुन्हेमुक्त जीवनाचे धडे,(exposed) रात्री मात्र चोरीचा धंदा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी अशा एका व्यक्तीला अटक केली आहे जो दिवसा लोकांना “गुन्हेगारीपासून दूर राहा, प्रामाणिक जीवन जगा” असा उपदेश देत होता, पण रात्री स्वतःच चोरी करत असल्याचे समोर आले आहे.

युट्यूबवर ‘चेंज योर लाइफ’ चॅनेल मनोज सिंह नावाच्या या व्यक्तीने स्वतःला सेल्फ हेल्प गुरू म्हणून सादर केले होते. त्याने ‘Change Your Life’ नावाचे युट्यूब चॅनेल सुरू केले होते. या चॅनेलवर तो दररोज व्हिडिओ पोस्ट करून लोकांना गुन्हेगारीमुक्त आणि अनुशासित जीवनाचे धडे द्यायचा.

त्याचा उद्देश लोकांना चुकीच्या मार्गावर न जाता योग्य मार्गावर आणण्याचा असल्याचे भासवले जात होते. लोक त्याच्या व्हिडिओंना पसंती देत होते, पण प्रत्यक्षात तो पूर्णपणे वेगळे जीवन जगत होता. रात्रीचा चेहरा – सराईत चोर मनोज सिंह हा कटक येथील रहिवासी असून रात्री मात्र तो चोर म्हणून सक्रिय होता.

14 ऑगस्ट रोजी भरतपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका घरातून सुमारे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख 5 लाख रुपये चोरले. पोलिसांनी(exposed) त्याच्याकडून 200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपये रोख जप्त केले. तपासात समोर आले की त्याच्यावर आधीपासूनच 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्यात अनेक चोरीच्या घटनांचा समावेश आहे.

पर्दाफाश कसा झाला? पोलिसांना खंडगिरी बाडी परिसरात झालेल्या चोरीची माहिती मिळाली. त्यानंतर: पोलिसांनी आठवडाभर त्याच्यावर लक्ष ठेवले. सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंट्स आणि तपास अहवालावरून त्याची ओळख पटली. शेवटी बुधवारी त्याला खंडगिरी बाडी येथून अटक करण्यात आली.

घरफोडीची घटना ज्या घरात चोरी झाली त्या घराच्या मालकिणीने सांगितले: चोरीच्या वेळी त्या ऑफिसमध्ये होत्या आणि त्यांचे पती मीटिंगला गेले होते. दुपारी साधारण 2 वाजता जेव्हा पती घरी परतले, तेव्हा मुख्य दरवाजा आणि लॉकर रूमचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब होती.

पोलिसांचे आवाहन भुवनेश्वर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की: ऑनलाइन व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये. कुणी कितीही प्रामाणिकपणाचा आणि चांगल्या जीवनशैलीचा उपदेश करत असला, तरी त्याचा खरा (exposed) चेहरा वेगळा असू शकतो. मनोज सिंहचा हा दुहेरी चेहरा पाहून लोक हादरले आहेत. दिवसा तो प्रामाणिकतेचे धडे देत होता, तर रात्री सराईत चोर बनून लोकांना लुटत होता.

हेही वाचा :

तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो!

भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक

एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स