वैदिक शास्त्रानुसार, आज 1 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस सोमवार असल्या कारणाने हा दिवस आपण भगवान शंकराला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने धनु राशीत(zodiac signs) प्रवेश केला आहे. आज गुरु आणि मंगळ ग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. त्यामुळे अनेक राशी भाग्यशाली ठरतील.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही जास्त सहभागी व्हाल. एखाद्या नवीन शुभ कार्याची सुरुवात तुम्ही आजपासून करु शकता. तसेच, आज सप्टेंबरचा पहिला दिवस असल्या कारणाने तुम्ही संकल्प करु शकता.

कर्क रास
कर्क राशीसाठी(zodiac signs) आजचा दिवस लाभदायक असणार आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला नवीन डील मिळू शकते. तसेच, आजच्या दिवसात तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. आज तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, सरकारी योजनांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे तुम्हाला सहज पूर्ण करता येऊ शकतात.

कन्या रास
कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळे. भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तसेच, एखादं हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या कामावर तुमचा बॉस प्रसन्न होईल. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडा.

तूळ रास
तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला आज एखाद्या मित्राच्या सहकार्याने तुमचं काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी तुम्ही स्वत:ला तयार करा.

कुंभ रास
कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. नशिबाची साथ तुमच्या बरोबर असल्या कारणाने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तसेच, ग्रहांची स्थिती देखील शुभ असल्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा लाभ घेता येईल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची रखडलेली कामे तुम्ही सहज पूर्ण करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी