नर्गिससोबत बोलायचं आहे… आतल्या खोलीत नेलं अन्… सोलापूर भयंकर घटनेनं हादरलं

सोलापूर शहरात नवविवाहित दांपत्यातील वादातून उभा राहिलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक कुरबुरीचे रूपांतर थेट (shocking incident) हिंसाचारात झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लग्नाला अवघे काही महिने झाले असताना पती-पत्नीतील वाद इतका टोकाला गेला की संतप्त पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे.

लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या नर्गिस शेख या तरुणीवर तिच्या पती फैजान जावेद शेख याने पेट्रोल ओतून आग लावल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नर्गिसच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला जळत्या अवस्थेतून वाचवत तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, 2024 मध्ये विवाह झाल्यानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. वाद वाढत गेल्याने ते काही काळापासून वेगळे राहत होते. तलाकाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पती पत्नीशी बोलण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला आणि खोलीत नेऊन पुन्हा वाद घातला. या वादातूनच त्याने संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून पीडितेची जबानी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामागील नेमके कारण, शेवटचा वाद कशावरून झाला आणि आरोपीला कोणाची साथ होती का, याचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक वादांच्या वाढत्या तीव्रतेचा आणि त्यातून होणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजमाध्यमांवरही या घटनेवर संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा

धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप

मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल