मराठा आरक्षणाच्या(Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं बेमुदत उपोषण अखेर यशस्वी ठरलं. या आंदोलनामुळे मुंबईसह राज्य सरकारसमोरही मोठी कोंडी निर्माण झाली होती.सरकारशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या मागण्यांवर अंतिम तोडगा काढला. राज्य सरकारने आठपैकी सहा प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, त्यासाठी शासन निर्णयांचा मसुदा उपसमितीने तयार ठेवला होता. या मसुद्यावर जरांगे आणि उपसमितीमध्ये खुली चर्चा झाली. जरांगे यांनी सुचवलेल्या दुरुस्त्याही मान्य करण्यात आल्या.

हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर स्वीकारल्यानंतर विखे पाटील यांच्या हातून लिंबूपाणी घेऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर ते संभाजीनगरला रवाना झाले असून, सध्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांपासून उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करताना चक्कर येत होती तसेच पोटदुखीचा त्रास होत होता. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असली तरी आवश्यक उपचार सुरू असून विविध चाचण्या घेण्यात येत आहेत.मराठा आरक्षणाच्या चळवळीत हा टप्पा महत्त्वाचा मानला जात असून, समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे(Reservation).
हेही वाचा :
Home Loan वर 0% व्याज, ₹1 ही मोजावा लागणार नाही…
जल्लोष झाला… पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? जाणून घ्या
“आझाद मैदानावरील जल्लोषात जरांगे-विखे पाटलांची सिक्रेट बैठक, कानात कानात नेमकी काय कुजबुज?”