बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील फुलवारीशरीफ परिसरात कौटुंबिक वादातून भीषण घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी २४ वर्षीय रिजवान कुरेशीची त्याच्या स्वतःच्या घरात(home) कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा खून त्याच्या मोठ्या भावाच्या पत्नी शबनमनेच केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

घटनेच्या दिवशी रिजवान आपल्या खोलीत झोपलेला असताना, शबनमने पतीला बेडरूममध्ये कोंडून ठेवले आणि थेट दीराच्या खोलीत जाऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला(home). सकाळी मोठी वहिनी त्याला उठवण्यासाठी गेली असता रिजवान रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळला. तिच्या किंकाळीने संपूर्ण घर हादरले.

कुटुंबीयांनी पोलिसांना कळविल्यानंतर फुलवारीशरीफ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एफएसएल टीम घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हेच खुनामागील कारण असल्याचे समोर आले आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, रिजवान अविवाहित असताना त्याचे वहिनी शबनमसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, एक वर्षापूर्वी त्याचे लग्न झाल्यानंतर तो पूर्णपणे पत्नीशी बांधील राहू लागला. यामुळे शबनम संतप्त झाली होती. पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून तिने रागाच्या भरात ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.सध्या आरोपी शबनम फरार असून तिच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीय शोकाकुल आहेत.

हेही वाचा :

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची माहिती
Home Loan वर 0% व्याज, ₹1 ही मोजावा लागणार नाही…
जल्लोष झाला… पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? जाणून घ्या