बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचं काळं सत्य अनेकदा समोर आलं आहे. बिग बॉस 19 ची कंटेस्टंट आणि अभिनेत्री (actress)कुनिका सदानंद हिनेही याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील कटू अनुभव मोकळेपणाने शेअर केले.

कुनिका म्हणाली, “मला दोन चित्रपटांतून काढून टाकलं, कारण मी कॉम्प्रमाइज करायला नकार दिला होता. त्यापैकी एक चित्रपट मोठा होता, ज्याचा दिग्दर्शक मोठं नाव होतं आणि अभिनेता माझ्या वडिलांसमान वयाचा होता. पण त्यांनीही मला कॉम्प्रमाइजसाठी दबाव टाकला. नकार दिल्यानंतर मला रोलमधून काढून टाकलं.”

अभिनेत्रीने (actress)सांगितलं की, “मी खलनायिकेच्या भूमिकेसाठी निवडली होती. माझे कपडेही तयार झाले होते, दुसऱ्या दिवशी फ्लाइटची तिकिटंही झाली होती. पण प्रोड्यूसर सरळ म्हणाले की, ‘तू कॉम्प्रमाइज करणार नाहीस तर मी दोन भुकेल्या सिंहांना घेऊन चालली आहे. ४० दिवस शूटिंगदरम्यान त्यांच्यासमोर काहीतरी टाकावं लागेल.’ तेव्हा मी खूप रडले.”

कुनिकाने आणखी एक धक्कादायक किस्सा सांगितला. तिच्या म्हणण्यानुसार, एका मोठ्या कॅमरामनचा असिस्टंट हिरोईनच्या जवळ मुद्दाम परफ्यूम लावून यायचा आणि कानात सांगायचा – “आज संध्याकाळी या हॉटेलमध्ये भेट.”
तिने सांगितलं की, “त्या काळात फिल्म इंडस्ट्रीकडे लोक वाईट दृष्टीकोनातून बघायचे. चांगल्या घरातील मुली इंडस्ट्रीत येत नाहीत, असं सर्रास बोललं जायचं.”कुनिका सदानंदच्या या खुलास्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचच्या गलिच्छ वास्तवाला उजाळा दिला आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला…..
मराठ्यांची फसवणूक? सरकारने दोन समाजात वाद लावला अन्…
झोमॅटो वापरकर्त्यांसाठी बातमी आता प्रत्येक ऑर्डरवर द्यावा लागणार ‘हा’ चार्ज