कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
इसवी सन 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली. पण त्यांच्या विरोधात शिवसैनिक मोठ्या पेशाने उतरले आहेत असे चित्र दिसले नव्हते. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्यावर गेलेल्या आमदारांना पराभवांला सामोरे जावे लागले होते. छगन भुजबळ यांची पक्ष फोडीची कृती सामान्य जनतेला तेव्हा पटलेली नव्हती. (Shiv Sena) त्यानंतर नारायण राणे यांनी पक्षात बंड केले आणि डझनभर आमदारांना घेऊन ते काँग्रेसमध्ये गेले. तेव्हाही त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी फार मोठे आंदोलन केले असे घडले नाही. पण नंतरच्या निवडणुकीत राण्यांच्या बरोबर गेलेले सर्व आमदार पराभूत झाले होते. शिवसैनिकांनी नव्हे तर सर्वसामान्य मतदारांनी नारायण राणे यांच्या बंडाला त्याचा पराभव करून उत्तर दिले होते. दरम्यानच्या काळात गणेश नाईक यांनी अशाच प्रकारे बंड केले होते पण ते दखल घ्यावे इतके नव्हते.

एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत फूट पाडली. चाळीस आमदारांना घेऊन ते बाहेर पडले. पण नंतर 2025 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 55 पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. 1989 मध्ये किंवा 1990 च्या दशकात शिवसेनेची महाराष्ट्रात जी राजकीय दहशत होती त्या दहशतीला नंतरच्या काळात उतरती कळा लागली असे म्हणावे लागेल. तसे नसते तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाले नसते. आम्ही शिवसेनेच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला का उपस्थित राहिलो नाही याचे कारण सांगताना त्या सहा खासदारांनी”संजय राऊत यांनी केलेल्या शिविगाळी”चा उल्लेख केलेला आहे. (Shiv Sena) त्यांचे हे कारण पटेल असे नाही. पण या सहा खासदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे हे अधिकृतपणे स्पष्ट होण्याच्या आधीच संजय राऊत यांनी संबंधित खासदारांनी 15 कोटी रुपये प्रत्येकी ॲडव्हान्स म्हणून घेतले आहेत असा आरोप केला होता. आधी गद्दारीचा आरोप करायचा आणि नंतर बैठकीला या म्हणायचे हे कुठल्याही राजकीय तत्वात बसत नाही. आता तर त्यांनी फुटीर खासदारांना मतदारसंघांमध्ये आल्यानंतर तुडवा असा फतवा त्यांनी काढला असला तरी, त्याला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल असे चित्र दिसत नाही. काही ठिकाणी केलेल्या आंदोलनात फार मोठ्या संख्येने शिवसैनिक होते हे दिसले नाही. कारण आजच्या शिवसेनेने आपली राजकीय दहशत केव्हाच संपवून टाकली आहे.
आता पुन्हा हे प्रकरण कारणे दाखवा या नोटीसी पासून सुरु होईल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकेच्या माध्यमातून जाईल आणि तिथे प्रलंबित होईल. कारण 2022 चा निकाल अद्याप लागलेला नाही. आता त्यामध्ये 2026 च्या बंडाची भर पडेल इतकेच. उद्धव ठाकरे गटातून आम्ही बाहेर का पडलो याचे स्पष्टीकरण त्या सहा खासदारांनी अद्यापही अधिकृतपणे दिलेले नाही. उद्धव ठाकरे गट हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, आणि हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे आणि म्हणूनच आम्ही शिवसेनेतून बाहेर पडत आहे. आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी अशा आशयाचे पत्र या सहा खासदारांनी लोकसभेचे सभापती श्री ओम बिर्ला यांना सादर केले आहे असे समजते. या सहा खासदारांच नक्की काय होणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदेशाहीत दाखल झाले असल्याचे गुरुवारी अधिकृतपणे स्पष्ट झाले.
आता या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी तुडवावे असा फतवा संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी काढला आहे. पण 90 च्या दशकात शिवसेनेची असलेली राजकीय दहशत आता उरली आहे का? “तुझा श्रीधर खोपकर करू”असा गर्भित इशारा देणारी तेव्हाची शिवसेना आत्ता कुठे दिसते का? इसवी सन 1989 मध्ये ठाणे महापालिकेत महापौर पदाची निवडणूक होती. शिवसेनेचा महापौर होईल असे वातावरण होते पण तेव्हा शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या श्रीधर खोपकर यांनी क्रॉस वोटिंग केले. परिणामी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर श्रीधर खोपकर यांची हत्या करण्यात आली. (Shiv Sena) त्याचा ठपका आनंद दिघे यांच्यावर ठेवण्यात आला होता. खोपकर यांच्या हत्येने तेव्हा महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली होती. पक्ष विरोधी भूमिका घेतली तर श्रीधर खोपकर होईल अशी एक राजकीय दहशत तेव्हा शिवसेनेने निर्माण केली होती.
हेही वाचा :