शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या २३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतानाच लाखो लाभार्थ्यांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २० जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार असले तरी, यंदाच्या लाभार्थी यादीत सुमारे दोन लाख शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याचे दिसून आले आहे. (farmers) त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये आपल्याला हप्ता मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पीएम-किसानच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, यंदा ९४.४ दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे. याआधी मार्च महिन्यात वितरित करण्यात आलेल्या २२ व्या हप्त्यात ९४.६ दशलक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. या तुलनेत सुमारे दोन लाख लाभार्थी कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागे ई-केवायसी अपूर्ण असणे, भूमी अभिलेखांची पडताळणी न होणे तसेच पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसलेल्या अर्जदारांची नावे वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने पीएम-किसान योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-केवायसी आणि जमीन नोंदींची पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा जमिनीची माहिती अद्ययावत केलेली नाही, (farmers) त्यांना हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य लाभ घेत असल्यास किंवा नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, लाभार्थ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत पीएम-किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने स्टेटस तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी स्थिती हिरव्या चिन्हासह दिसत असल्यास लाभ मिळण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मानले जाते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २० जून रोजी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथून २३ व्या हप्त्याचे वितरण करणार असून, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १८,८८० कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. (farmers) मात्र, यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांसाठी हा हप्ता हुकण्याची शक्यता असल्याने त्यांनी तातडीने आपली कागदपत्रे आणि पात्रता तपासून आवश्यक दुरुस्त्या करणे गरजेचे ठरणार आहे.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?