महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिर (temple) संदर्भात प्रशासनाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय भाविकांसाठी दिलासादायक ठरला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी गाभाऱ्यातून दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय अखेर मागे घेतल्याने शिवभक्तांना पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान घृष्णेश्वराचे दर्शन आणि स्पर्श करता येणार आहे.

महाशिवरात्रीला येथे दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत (temple) असल्याने गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाने काही दिवसांपूर्वी गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार भक्तांना गाभाऱ्याच्या दरवाजातूनच दर्शन घ्यावे लागत होते. तसेच ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर बाहेरून जलाभिषेक करण्याची आणि व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याची भूमिकाही प्रशासनाने घेतली होती. स्थानिक ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहा वाजेपर्यंत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची (temple) शेकडो वर्षांची परंपरा असल्याने भाविक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी गाभाऱ्यात प्रवेश बंद करणे धार्मिक भावनांना धक्का देणारे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. 15 फेब्रुवारी रोजी भरत असलेल्या यात्रेसाठी देशभरातून येणाऱ्या भक्तांनीही गाभारा दर्शन सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागली तरी चालेल, पण पारंपरिक पद्धतीने दर्शनाची संधी मिळावी, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

भाविकांच्या भावना आणि स्थानिक परंपरा लक्षात (temple) घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वीचा निर्णय मागे घेत सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना पुन्हा गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गाभाऱ्यातून दर्शनास परवानगी मिळाल्याने दर्शनासाठी प्रतीक्षा वेळ वाढण्याची शक्यता असली तरी भाविकांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती राहणार असून वेरूळ नगरी पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे.

हेही वाचा :

घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?

बॉलिवूडचा सर्वात जास्त बोल्ड चित्रपट, पाहण्यासाठी थिएटर बाहेर रांगेत लागायचे लोक, ज्याने इंडस्ट्री हादरवली होती

या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार