तुम्हीदेखील आज किंवा पुढच्या ३ दिवसांत बँकेत काही कामानिमित्त जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मोहरमच्या निमित्ताने आज देशभरातील अनेक सरकारी ऑफिससह बँकांनाही सुट्टी देण्यात आली आहे. (holiday) दरम्यान २७ ते २९ जूनपर्यंत बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनो बँकेतील तुमची कामे काही दिवस रखडली जातील. मात्र ऑनलाईन सेवांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत सुट्टीच्या दिनदर्शिकेनुसार, मोहरम आणि आशुरानिमित्त देशातील बहुतांश प्रमुख बँकिंग केंद्रांमध्ये आज बँका बंद राहणार आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ, पाटणा, रांची आणि रायपूर यांसह देशातील १८ प्रमुख बँकमध्ये व्यवहार ठप्प राहतील.

ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील सलग तीन दिवस अनेक ठिकाणी बँकिंग सेवा बंद राहणार आहेत. २७ जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील, तर २८ जून रोजी नियमित रविवारची सुट्टी असेल. (holiday) त्यामुळे बँक शाखांमधील व्यवहारांसाठी ग्राहकांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण याशिवाय, २९ जून रोजी संत गुरु कबीर जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बँकांना सुट्टी असेल. तसेच ३० जून रोजी रेमना नी निमित्त मिझोरामची राजधानी आयझॉलमधील बँका बंद राहणार आहेत. (holiday) त्यामुळे ग्राहकांनी चेक जमा करणे, रोख रक्कम काढणे किंवा इतर कामांसाठी नियोजन करूनच बँकेत जाणे आवश्यक आहे. मात्र, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
हेही वाचा :
राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?
घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?