पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी?

देशाच्या अनेक भागांमध्ये पावासाचे आगमन आधीच सुरू झाले आहे. पावसाळा ऋतू सुरू होताच निसर्गप्रेमी या दिवसांमध्ये अनेक डोंगराळ तसेच निसर्गरम्य भागांना भेट देतात. पण पावसाच्या दिवसात कोणत्याही ठिकाणांना भेट देताना काही धोकेही असतात. (rainy season) त्यामुळे प्रवासाचा प्लॅन करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. हा ऋतू अनेक लोकांना प्रवासाकडे आकर्षित करतो. कारण पावसाळ्याच्या ऋतूत डोंगर, धबधबे आणि हिरवीगार वनराई अधिकच सुंदर दिसू लागते, ज्यामुळे लोकं सुट्ट्यां घेऊन बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. मात्र हा पावसाळा जेवढा सुंदर वाटतो तेवढाच काही आव्हानेही घेऊन येतो. या काळात हवामानातील अचानक बदल, पाणी साचणे आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. (rainy season) त्यामुळे पावसाळ्यात फिरायला जाताना अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी विशेषतः आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कधीकधी काहीजण आरोग्यासोबतच इतर कोणतीही तयारी न करताच बाहेर फिरायला जायला निघतात, ज्यामुळे लहान समस्या मोठी रूप घेते. योग्य नियोजन आणि सावधगिरी बाळगल्यास, पावसाळ्यातील प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यातील प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि निरोगी व सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

पावसाळ्यात प्रवास करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासा. मुसळधार पाऊस, भूस्खलन किंवा पाणी साचण्याची शक्यता असलेले भाग टाळा. अत्यावश्यक औषधे, अतिरिक्त कपडे, रेनकोट, छत्री आणि वॉटरप्रुफ पिशवी सोबत ठेवा. बाहेर खाण्याऐवजी स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करण्याकडे लक्ष द्या. पिण्यासाठी नेहमी सुरक्षित आणि पॅकेज केलेले पाणी वापरा. ​​प्रवास करताना आरामदायक आणि न घसरणारे बूट घाला.तसेच तुमचा मोबाईल फोन, पॉवर बँक आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. मुलांसोबत किंवा वृद्ध व्यक्तींसोबत प्रवास करत असाल, तर त्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या आणि गरज पडल्यास तुमच्या प्रवासाच्या योजना बदलण्यास अजिबात संकोच करू नका.

पावसाळ्यात प्रवासादरम्यान पोटाचे विकार, अन्नातून विषबाधा, सर्दी, ताप, त्वचेचे संक्रमण यांचा धोका वाढू शकतो. पावसाचे पाणी आणि धुळीच्या संपर्कामुळे (rainy season) काही लोकांमध्ये ॲलर्जी आणि बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो.याव्यतिरिक्त जास्त वेळ ओले कपडे किंवा बूट घालून राहिल्याने त्वचेच्या समस्या वाढू शकतात. ताप, जुलाब, उलट्या, अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.पावसाळ्यात प्रवास करताना स्वच्छतेचे पालन करा आणि वारंवार हात धुवा. भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. अतिश्रम टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या.याव्यतिरिक्त हवामानानुसार नेहमी योग्य कपडे घाला आणि गरज पडल्यास प्रवासाचे नियोजन बदला. साध्या खबरदारी घेतल्यास पावसाळ्यातील प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि आनंददायक होऊ शकतो.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?