अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी अलीकडच्या काळात इराणविरोधात (US President) अधिक कठोर भूमिका घेतल्याचे चित्र समोर येत आहे. इराणमधील सत्ताव्यवस्थेबाबत त्यांनी वारंवार आक्रमक वक्तव्ये केली असून, गरज पडल्यास कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेकडून मध्यपूर्वेत लष्करी हालचाली वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे प्रभावी नेते आणि सिनेटर Lindsey Graham यांनी इस्रायल दौऱ्यावर (US President) असताना इराणविषयी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. Tel Aviv येथे बोलताना त्यांनी इराणबाबत मोठा निर्णय घेण्यासाठी काही महिने नव्हे तर काही आठवडे लागू शकतात, असे सूचित केले. इराणचे सर्वोच्च नेते Ali Khamenei यांच्या नेतृत्वाखालील धोरणांवर त्यांनी तीव्र टीका केली आणि इराणमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ग्रॅहम हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
एकीकडे तणाव वाढत असताना (US President) दुसरीकडे राजनैतिक पातळीवर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. Oman येथे अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच बैठक पार पडली असून, पुढील आठवड्यात आणखी एक फेरी होण्याची शक्यता आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच लष्करी पर्यायांबाबत होणारी चर्चा जागतिक स्तरावर चिंतेचे कारण ठरत आहे.
अमेरिका आणि Israel यांची इराणविषयी भूमिका मोठ्या (US President) प्रमाणावर एकसारखी असल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत परिस्थिती कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मध्यपूर्वेतील स्थैर्य, जागतिक राजकारण आणि ऊर्जा बाजारावर या घडामोडींचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली