महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नीट परिक्षेनंतर आता आणखी एक पेपरफुटीचा प्रकार समोर आला आहे (examination) ज्यामुळे पु्न्हा एकदा राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यभरातील लाखो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) पेपरफुटीच्या वादळात सापडली आहे. उद्या रविवार, २८ जून २०२६ रोजी होणारा टीईटी परीक्षेचा पेपर अवघ्या २४ तासांआधीच ठाणे आणि भिवंडी परिसरात लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तातडीने पावले उचलत उद्याची परीक्षा स्थगित (रद्द) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

पोलिसांची धाडसी कारवाई; ‘भिवंडी-ठाण्यात’ रॅकेट उघड आधीच सुगावा लागला: पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, ठाणे आणि भिवंडी परिसरातील काही टोळ्या पैशांची मोठी देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेचा गोपनीय पेपर पोहोचवत आहेत. प्रश्नपत्रिका जप्त: माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून ज्या संशयितांकडे हा पेपर होता, (examination) त्यांच्यावर धाड टाकली आणि प्रश्नपत्रिका जप्त केल्या. मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी या जप्त केलेल्या प्रती तंतोतंत जुळल्याने पेपर फुटल्याची खात्री पटली.कोचिंग क्लासेस पोलिसांच्या ताब्यात: प्राथमिक माहितीनुसार, या मोठ्या रॅकेटमध्ये काही खाजगी कोचिंग क्लासेसचे चालक आणि शिक्षण विभागातील काही संशयास्पद कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी काही मुख्य संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी संपूर्ण राज्यात एकूण १,०२८ केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. (examination) यासाठी २ लाख २६ हजारपेक्षा जास्त डी.टी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवारांनी अर्ज केले होते. उद्या सकाळी शिक्षक बनण्याचे स्वप्न घेऊन परीक्षा केंद्रावर जाण्याच्या तयारीत असलेल्या या लाखो उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा मानसिक धक्का बसला असून परीक्षार्थींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. पेपरफुटीमुळे उद्याची परीक्षा पूर्णपणे स्थगित करण्यात आली असून, आता परीक्षेची नवीन तारीख आगामी काळात अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नवीन अपडेट्ससाठी अधिकृत परिपत्रकाची वाट पहावी.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?