इचलकरंजीत लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संशयिताच्या भावाला चोपले?

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या आमिषाने फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Ichalkaranji) या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर अल्लाबक्ष मणेर (रा. पवार माळ, इचलकरंजी) याने समाजमाध्यमांच्या माध्यमातून पीडित मुलींशी ओळख वाढवली. विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. (Ichalkaranji) दोन्ही प्रकरणांतील तक्रारी प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ गुन्हे नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांकडून घटनास्थळाशी संबंधित पुरावे संकलित केले जात असून पीडित मुलींचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. तपासादरम्यान डिजिटल पुरावे आणि इतर बाबींचीही पडताळणी केली जात आहे.या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. (Ichalkaranji) तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?