जेव्हा श्रद्धेवरच दरोडा पडतो?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

कुंपणानेच शेत खाल्ले, तळे राखील तो पाणी चाखेल, चोरांच्या हातात जामदार खान्याच्या किल्ल्या अशा काही म्हणी मराठीत प्रचलित आहेत आणि त्या मानवी मोहाशी, लालची स्वभावाशी संबंधित मानल्या जातात. पण ही म्हण किंवा या म्हणी मंदिरातील दानपेटीशी, देवाच्या खजिन्याशी जोडल्या जातील असे कधीही वाटले नव्हते. अयोध्या राम मंदिरातील खजिन्यामध्ये मंदिर प्रशासनातील कर्मचारी यांनी अधिकाऱ्यांच्याकडून हेराफेरी झाल्याचे उघडकीस (Jamdar Khanya) आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. हा तर करोडो राम भक्तांच्या श्रद्धेवरील दरोडा असल्याचे मानले जाते.

पूर्वीच्या फैजाबाद येथील राम मंदिराला फार मोठा अध्यात्मिक वारसा आहे. हिला राम जन्मभूमी म्हटले जाते आणि तशी करोडो हिंदूंची धारणा आहे आणि श्रद्धा आहे. सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी रामाची जन्मभूमी असलेले हे मंदिर पाडून तेथे बाबरा च्या नावाने मस्जिद बांधण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेने तसेच राम जन्मभूमी न्यासाच्या वतीने बाबरी मशिदीवर ती पूर्वीची राम जन्मभूमी असल्याचा दावा केला होता आणि त्यासाठी देशभर एक मोठे आंदोलन विभाग करण्यात आले होते. रस्त्यावरील लढाई बरोबरच न्यायालयीन लढाई सुद्धा त्यासाठी सुरू होती आणि अखेर हिंदूंच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि जिथे बाबरी मशीद पाडली होती तिथे राम मंदिर उभा करण्याचा निर्णय आणि निर्धार करण्यात आला होता. (Jamdar Khanya) त्यासाठी स्वतंत्र ज्ञासाची उभारणी करण्यात आली होती. आणि या न्यासाच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आले आणि त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

आज अयोध्या येथील राम मंदिर हे देशातील राम भक्तांचे मुख्य धार्मिक स्थान बनले आहे. दररोज देशभरातून हजारो भाविक इथे येत असतात. भाविकांच्या कडून मोठ्या प्रमाणावर या मंदिरासाठी दान दिले जाते. तिरुपती बालाजी मंदिरानंतरचे सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून अयोध्याच्या श्रीराम मंदिराकडे पाहिले जाते. शेकडो राम भक्तांनी या मंदिरासाठी प्रतीकात्मक म्हणून चांदीच्या विटा दिल्या आहेत आणि त्याची रीतसर नोंद आहे.आयोध्याच्या राम मंदिरामध्ये काहीतरी आर्थिक घोटाळा झालेला आहे. मंदिरातील दानपेटीवर अज्ञातांनी डल्ला मारला आहे अशी कुजबुज सुरू झाली आणि नंतरच्या प्राथमिक चौकशीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस यंत्रणांकडून रितसर तपास सुरू झाला आणि या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. काही कोटी रुपये किमतीच्या चांदीच्या विटा गायब झालेल्या आहेत आणि जामदार खजिन्यातील सुमारे 200 कोटी रुपये चोरीस गेले आहेत असे स्पष्ट झाल्यानंतर देशभर खळबळ उडणे स्वाभाविक आहे.

श्रीराम मंदिर उभारण्यात भारतीय जनता पक्षाचा मोठा सहभाग आहे. भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या राम मंदिरा निर्माण साठी देशभर आंदोलन उभे केले होते. त्यामुळे या मंदिराचे शिल्पकार म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते. साहजिकच मंदिरातील हेराफेरी बद्दल भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षांनी धारेवर धरले आहे. कारण अयोध्येतील श्री राम मंदिर ही तमाम हिंदूंची अध्यात्मिक अस्मिता आहे. भारतामध्ये अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. या मंदिरांची संपत्ती हजारो कोटी रुपयांची आहे. पण आजपर्यंत कोणत्याही श्रीमंत देवस्थानामध्ये चोरी झाली आहे, मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाली आहे असे कधीही घडलेले नाही. दुर्दैवाने अयोध्या येथील राम मंदिर त्याला अपवाद ठरले आहे. श्री राम मंदिराच्या निर्माणाकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. कारण राम जन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंनी काही शतकांचा लढा दिलेला आहे. साडेपाचशे वर्षानंतर राम जन्मभूमी मुक्त झाली आणि तेथे राम मंदिर उभारण्यात आले. आता अयोध्या ही हिंदूंची पवित्र भूमी झाली आहे. (Jamdar Khanya) अशा या मंदिरात आर्थिक हेराफेरी होणे हे राम भक्तांसाठी वेदनादायी आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे अतिशय कठोर प्रशासक मानले जातात. त्यांच्याच राज्यातील श्री राम मंदिरामध्ये हेराफेरी झाल्यानंतर ते संतप्त होणे स्वाभाविक होते. हेराफेरी मध्ये ज्यांचा हात आहे, त्यांना सोडणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. या प्रकरणाचा तपास अतिशय सखोलपणे सुरू झाल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या 14 जणांना अटक करण्यात आली आहे. या मंडळींनी राम मंदिराच्या मदत पेटीएम मधील पैशावर कसा हात मारला त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. या हेराफेरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून श्रीराम मंदिर न्यासाच्या चंपत राय यांनी राजीनामा दिला आहे. आता तर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आता तिथे आयएएस अधिकाऱ्याला मुख्य विश्वस्त म्हणून नियुक्त केले जाणार आहे.

श्रीराम मंदिरातील जामदारखान्याया मध्ये खजिन्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे. हे विश्वस्त मंडळाच्या ध्यानात कसे काय आले नाही याचे आश्चर्य आहे. ही चोरी किंवा हेराफेरी एका रात्रीत झालेली नाही. ती अनेक महिने होत होती आणि तिकडे विश्वस्त मंडळाचे लक्ष नव्हते किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे म्हणता येईल. चांदीच्या विटांसह 200 कोटी रुपयांची चोरी होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या मंडळींनी करोडो राम भक्तांच्या श्रद्धेवरच दरोडा टाकला आहे असे म्हणता येईल.या घटनेला अप्रत्यक्षपणे विश्वस्त मंडळ जबाबदार आहे आणि म्हणूनच या मंडळातील विश्वस्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे.आदर्श राज्य व्यवस्थेला “राम राज्य”म्हटले जाते. असे रामराज्य वास्तवात शक्य नाही. आणि इथे तर श्रीरामाच्या खजिन्यावरच मंदिर व्यवस्थापनाकडूनच डल्ला मारला गेला आहे.या घटनेमुळे नरेंद्र मोदी यांच्या तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिष्ठेला आणि सन्मानाला तडा गेला आहे.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?