सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा

सांगली आणि मिरज परिसरात (hailstorm)अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

काही वेळातच गारांचा मारा(hailstorm) सुरू झाल्याने शेतकऱ्यांची पिके आडवी पडली. द्राक्ष, ऊस, भाजीपाला आणि फळबागांना विशेष फटका बसल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर गारांचा साठा दिसून आला, तर वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला.या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी चिंतेत असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

हवामान विभागाने पुढील काही (hailstorm)तासांतही अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज पडल्यास मदतकार्य सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे.