सोशल मीडियावर सध्या एक दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) बंद करून तिच्या जागी ‘व्हीबी-जी राम जी’ (VBG Ram G) नावाची नवी रोजगार योजना 1 जुलै 2026 पासून लागू केली आहे. (Employment) तसेच या कथित योजनेअंतर्गत रोजगाराचे दिवस 100 वरून 125 करण्यात आल्याचा, किमान मजुरी वाढवण्यात आल्याचा आणि महिलांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्याचाही दावा करण्यात येत आहे.

मात्र या दाव्याची पडताळणी केल्यानंतर वेगळेच वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने मनरेगा योजना रद्द केल्याची किंवा ‘व्हीबी-जी राम जी’ नावाचा कोणताही नवीन कायदा किंवा रोजगार हमी योजना लागू केल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. ग्रामीण विकास मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर अशा निर्णयाची माहिती उपलब्ध नाही.
व्हायरल संदेशात नमूद करण्यात आलेले 125 दिवसांची रोजगार हमी, देशभरात किमान 300 रुपयांचे वेतन, स्मार्ट ग्रामीण पायाभूत सुविधांची नवीन कामे, महिलांचा सहभाग 40 टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि सात दिवसांत वेतन देण्याची हमी यासारखे सर्व दावे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाहीत.सध्या देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. (Employment) या योजनेअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी 100 दिवसांच्या अकुशल रोजगाराची कायदेशीर हमी मिळते. योजनेत कोणताही मूलभूत बदल किंवा नवीन कायदा लागू झाल्याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारच्या अशा महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल झाल्यास त्याची माहिती संसद, अधिकृत राजपत्र, ग्रामीण विकास मंत्रालय आणि सरकारी संकेतस्थळांद्वारे जाहीर केली जाते. (Employment) त्यामुळे सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे.त्यामुळे मनरेगा योजना बंद झाली असून तिच्या जागी ‘व्हीबी-जी राम जी’ योजना लागू झाली आहे, हा दावा दिशाभूल करणारा असून त्याला कोणताही अधिकृत आधार नाही. नागरिकांनी अशा व्हायरल संदेशांची सत्यता पडताळूनच त्यावर विश्वास ठेवावा.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?